प्रितीसंगम घाट काव्य पुष्प-१८२




☘️प्रितीसंगम घाट ☘️

कृष्णाबाई घाट कराडची चौपाटी 
शीतल सायंकाळी गर्दी फुलती 
खाद्य पदार्थांची खवय्येगिरीची
चव रेंगाळते जीभेवरी ❗

विरंगुळ्यासाठी गर्दी लोटती 
कृष्णाबाई  घाटावरी
कृष्णा-कोयनेच्या संगमावरी
घंटानाद घुमे कृष्णेच्या मंदिरी ❗

उंच डेरेदार वृक्षांची तोरणं
फुलझाडांनी परिसर फुलणं
हिरवळीवर बैठक मांडणं 
गप्पागोष्टीचा आनंद घेणं❗

भेळ पाणीपुरी यथेच्छ खाणं
बालपणीच्या आठवणी उजाळणं
कराडला गेलोकी घाटावर होतं जाणं
भेटीनं मन होतं ताजतवानं❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८२
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड