लालपरी एस.टी.काव्य पुष्प-१५८





लालपरी(एस. टी.बस)
२ जून वर्धापनदिन 

आम जनतेचा जनरथ
कडे कपारी बस धावती 
नोकरदारांचा दैनिक पथ 
वाडीवस्तीवर बस पोचती  |

मुलांच्या शिक्षणासाठी 
मोफत सवलतीचा पास 
मुलांचं शिकणं घडण्याला 
प्रवासाचा रोजचा  सहवास |

रस्ता तिथं लालपरीचा
खेडोपाडी चौफेर प्रवास
रातराणी ,जनतागाडी  
सामान्यांची गाडी खास |

डाकगाडी दर्शनगाडी पार्सलगाडी
शिवनेरीत शिवशाही प्रवास 
लाल रंगछटेच्या गाडीतला 
मनात रुंजतो कॉलेजचा प्रवास|

एशियाड निमआराम सुपरगाडीचा               
विनाथांबा आरामात प्रवास 
सवलतीच्या सुखसोयीचा 
मिळे गरजूंना सहवास |

शासकिय लाभार्थ्यांना 
सवलतीचा एस.टी.पास 
यात्राउत्सवाच्या काळात
एस टी चाच प्रवास खास  |

प्रासंगिक कराराने सहल घडती 
लालपरीत बसून गप्पांची मैफल रंगती 
घाटाच्या वळणावळणाने धावती 
निसर्गसौंदर्याची दृश्ये बघत प्रवासती|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१५८

Comments

  1. खूपच समर्पक शब्दरचना👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड