उजळले घाट काव्य पुष्प-१५६
💥🪔उजळले घाट🏮
त्रिपुरारी पौर्णिमेला
घाट उजाळला
दिव्यांच्या प्रकाशाने
परिसर उजळून गेला ||
वाईतल्या घाटांवरी
पणत्यांची रोषणाई
गणपती मंदिराची
आरास दिसे नवलाई||
बांधली तोरणे
विद्युत रोषणाईची
जलात पडली प्रतिमा
रंगीबेरंगी दीपांची||
आठवण येते मनोमनी
दिवाळीच्या दीपोत्सवाची
चंद्राच्या शीतल प्रकाशात
रुप खुलून दिसती घाटाचे ||
दिव्यांच्या ठिपक्यांची नक्षी
पहायला जनसागर लोटती
पणत्यांच्या सजावटीने
घाटांचं रुप प्रकाशती||
काव्य पुष्प-१५६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
फोटो साभार फेसबुक
Comments
Post a Comment