काव्य पुष्प-१७३,फुलपाखरु




     🦋 फुलपाखरु 
 फुलपाखरा सवे होऊया सान 
रंगबिरंगी पंख छान छान 
फुलांफुलावरती स्वच्छंदपण  
विहारती शोषायला मधूकण ||

 रुप सुंदर मोहक ते 
इवलेशे पंख फडकविते 
फुलावरी क्षणात बसते
पकडण्या मन अधिरते ||

तयाला धरण्या पळत जाणे 
क्षणात त्याचे भुर्रकन उडणे
स्वैर भरारीने मुक्त फिरणे
दुसऱ्या फुलाला बिलगणे||

क्षणात बसते क्षणात पळते 
मुक्तपणे सभोवती फिरते 
नाना छटेचे गोजिरे रुप ते 
फुलझाडे बघताना नजर वेधते||

फुलपाखरांचे मुक्त भिरभिरणं
मधकण टिपत मस्त जगणं  
स्वैर फिरण्याचा आनंद वाटणं
मनाच्या गाभाऱ्याला तृप्त करणं||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७३
फोटो सौजन्य फेसबुक श्री दशरथ गायकवाड
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड