ऐसै जीवन गाणे काव्य पुष्प-१५७


🍁ऐसै जीवन गाणे 


ऐसै जीवन गाणे 
जीवनवाटेतले  टिपलेले 
वेचक वेधक क्षण पाहूया 
आयुष्यातील आठवणी 
सुपात पाखडून घेऊया||

संघर्षाचे कष्टमय धान
जात्यात भरडून दळूया 
लोकगीतं ओव्या गात  
सुखाचे पीठ मिळवूया||

दु:खाच्या पेटत्या ढपल्यावर  
फुंकणीने फुंकर घालूया 
सुखाची चूल पेटवून 
समाधानाचा सैपाक रांधूया ||

निराशा अपयश ताणतणाव
पाटया वरवंट्याखाली वाटूया 
यश किर्तीच्या चवीची 
मसाला चटणी बनवूया ||

ध्येयाच्या थंडगार दुधाला 
चिकाटीचे विरजण लावूया 
जिद्दीचे दही रवीने घुसळून 
प्रगतीचे लोणी काढूया|•

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड