प्रिशा वाढदिवस शुभचिंतन काव्य पुष्प-१६१
आमची नात प्रिशाला वाढदिवसाच्या हार्दिक खुप खुप शुभेच्छा ❗
हसरी लाडली प्रिशापरी
जशी भवऱ्याची अरी
फिरायला अवखळ भारी
नव्या गोष्टींनी अचंबित करी|
आजी दिसली की बाबा कुठंय
बाबा दिसले की आजी कुठंय
खेळकर,अवखळ आहे हे खरंय
पण करुन बघायला लय आवडतय|
हॅलो आवाजाने मन् मोहरते
छबी दिसली की मन आनंदते
व्हिडिओ बघितला की मन हर्षते
नाचगाणे बघितले की मन प्रफुल्लते|
फोटो काढायची हौस भारी
स्मितहास्य चेहऱ्यावरी
मुक्तपणे सभोवती फिरी
घरभर खेळाचा पसारा करी |
आता लागली दुडूदुडू धावू
डब्यावर उभारुन घेई खाऊ
हसऱ्या प्रिशाची पापी घेवून
लाडानं म्हणतो मी माऊ माऊ |
काव्य पुष्प-१६१
श्री रविंद्र लटिंगे (आजोबा) ओझर्डे
वाई
Comments
Post a Comment