म्हैस काव्य पुष्प-१६४

 



☘️🍂 म्हैस

जलाशयाच्या काठी कुरण 
 गवतात तिथं म्हैशी चरती 
पाळीव दुधाळू जित्राब
धन्याला जीव लावती |

शेतकऱ्याची जीवदौलत 
शेतीवाडीला खत देती 
शेतकऱ्याची उपजिविका 
दुधा ताक लोण्यावर भागती|

काळाभोर रंग बाकदार शिंग 
समोर आडवं आलेल्याला ढुश्या मारती 
हाल्या हाल्या हाल्या आवाजाला 
रेकून राखोळ्याला साद देती |

म्हैशीची भारी चित्तरकथा 
आदरणीय पु.लं.नी लिहिली 
बिन कामाच्या नवरा सिनेमात 
म्हैस सुध्दा सेलिब्रिटी झाली|

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड