बहरली मायेची बाग काव्य पुष्प-१८५





🍁🌿🍁☘️🍁🍀🌹🌺🌸
***** बहरली मायेची बाग 

बहारदार नजारा जास्वंदीचा
नयनांना तृप्त करण्याचा 
आनंद मोद वाटण्याचा 
टपोऱ्या नक्षीमय आकाराचा 

गुलाब जास्वंदीची रंगीत फुले 
भगवे जास्वंद नजरेत भरले 
द्वारी फुलोऱ्यांनी स्वागत झाले 
क्षणभर पाय तिथंच रेंगाळले||

पुष्पांनी मोहिनी घातली
हर्षाची पखरण झाली 
वाटिका सेलिब्रिटी झाली 
तिच्या सवे दृश्ये चितारली ||

अभ्यागतांना भुरळ घालते 
आनंदाचे शिंपण करते 
घराचे सौंदर्य वाटिका खुलविते  
घरभेट मनगाभाऱ्यात  रेंगाळते||

गंध फुलांचा सदैव दरवळे 
रंग फुलांचा जीवनात उधळे 
फुलांनी फुलवावे स्नेहाचे मळे
वेलीवर बहरतील मैत्रीची फळे||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema. blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड