सूर्योदय काव्य पुष्प-१८४



      सूर्योदय
सूर्यानारायणाच्या प्रतिक्षेची 
आतुरता चराचराला लागती 
पुर्वेला आकाशी गुलाल उधळीत 
आगमनाची किरणे तेजोमय दिसती ||

नेत्रदीपक रंगाविष्काराची ढगांना झळाळी 
शुभसमयी न्याहाळताना मोहिनी घालते 
भगवी लालभडक मेघांची छटा 
पाहता क्षणी भान हरपते||

रम्य दृश्य अवनिचे दिसती
वृक्षराजींचे डोंगर सजती 
किलबिलाटाने घरटी सोडती
स्वैरपणे पाखरं संचारती||

उगवतीला पहा जरा 
उदयाचा आसमानी नजारा
मैदानावरुनी दिसतो खरा 
तनमनाला स्पर्शे वारा ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१८४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड