फडातली कोप काव्य पुष्प-१७२


🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
ऊसाच्या फडातली कोप

कारखान्याची धुराडी पेटली 
ऊसकामगारांची टोळी आली 
गावच्या बाहेर झोपड्या घातल्या 
भल्या सकाळी फडाकडे निघाल्या ||

फडातल्या उसाची कोप केली 
वाढ्याच्या पेंढीनं सावली धरली 
मायेने लेकरास्नी घरटं केलं
निरागस हास्य तोंडाव उमटलं||

धन्यासंग काबाडकष्ट करती 
मोळी बांधती,ऊस सोलती  
उन्हातान्हात राबराब राबती 
संसाराचा गाडा जोडीनं हाकती ||

शिवारात झोपड्या घालून राहणं
ऊसतोडणीचं काम करणं 
रोज नवं बांध धुंडाळित 
ऊसतोडीच काम करणं ||

भविष्य उद्याचं कसं घडावं
शिक्षण रोजगाराचं कोडं सुटावं
हाताला काम गरीबाला धन 
वंचिताला कृतीयुक्त शिक्षण||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१७२
फोटो साभार फेसबुक किरण पाटील
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड