सूर्योदय पाणलोट क्षेत्र काव्य पुष्प-१६८




🛶सूर्योदय पाणलोट क्षेत्र🛶

प्रभाते नारायणाची किरणे प्रकटली 
लालसर पिवळसर छटा आली 
शांत जलाशयाच्या बिलोरी आरश्यात 
डोंगराची प्रतिमा वलयांकित दिसली|

सकाळच्या नीरव प्रहरी    
दिसली डोंगरछबी भारी
आरस्पानी सौंदर्य जलाशयाचे 
दृश्य मनमोहक डोंगररांगांचे |

हिरव्यागार पालवीवर जलबिंदू सजले 
झाडाच्या डहाळीवर पक्षी बसले 
पक्ष्यांच्या किलबिलाटाने  
नजर वेधली  
जलावरुनी उडताना खगमाळ  दिसली|

स्वैर मुक्तपणे विहंगम संचार 
आकाशाच्या नजारा बहारदार
सभोवती दृश्यस्थळे फारच फार
बोटीतून केली सफर पार |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड