मैत्री टूर काव्य पुष्प-१६६
🤝मैत्री टूर 🤝
भटकंतीच्या सुरुवातीला झाला
दुसऱ्या गाडीचा खोळंबा
मग मांढरदेव घाटातल्या
मालवाठारला घेतला थांबा ||
नयनरम्य डोंगररांगा धरण
पाहुनी झाला अचंबा
हवा बदलाने तनमनाला
होऊ लागला वाऱ्याचा झोंबा ||
घाटातला निसर्ग नजारा
पहायला मन रंगले
मनसोक्त पोजमध्ये
मजेमजेचे फोटो टिपले||
विहंगम दृश्य नदीच्याअलंकाराचे
हिरव्या पिवळ्या रंगछटेचे
फोटोत टिपले गठबंधन मैत्रिचे
चेहऱ्यावर उमटले हास्य समाधानाचे||
निसर्गाच्या सान्निध्यात भटकताना
वाऱ्याच्या झुळकीने तन मोहरले
हिरव्यागार झाडांच्या पानांचे पुंजके
उठावाच्या रांगोळीचे ठसे भासले||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
लय भारी
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete