Posts

Showing posts from November, 2020

शीतल सांज काव्य पुष्प-१५५

Image
*शीतल सांज* शांत सायंकाळी विलोभनीय बिंब दिवाकराचे रुप नजर वेधते   ढगांना गुलालाची लाली  आकाशी उजळून दिसते || रवि किरणांचा तेजोमय प्रकाश  लाल सोनेरी रंग उधळतो  मनमोहक सूर्यास्ताचा देखावा क्षणात नयनाने टिपतो || डोंगरमाथ्यावरुनी दिसे  मोहक रुप अस्ताचं  क्षितीजावरील निळसर छटेत धूसर होत असल्याचं|| हे प्रभाकरा तुला नमितो  तेजोमय चेतनेची वाट पहातो  तुझ्या सौंदर्यासह पवनचक्की अन् झाडवेलींचे दृश्य टिपतो|| काव्य पुष्प-१५५ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

सूत्रसंचालन शुभविवाह

     *सस्नेह निमंत्रण दोन कुटुंबातील ऋणानुबंधाच्या गाठी,त्रिरत्नांच्या पवित्र धाग्याने गुंफणारा सोहळा, चांदण्याची शितलता, सागराची विशालता, पृथ्वीचे औदार्य, आपल्या आशिर्वादात गोवून वधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण  सहकुटुंब सहपरीवार विवाह सोहळ्यास उपस्थित  राहिलात त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक स्वागत 💥💥💥🕹🕹💥💥 शुभविवाह सोहळा एक क्षण पहिला प्रहर एक क्षण मेंदीचा बहर एक क्षण लगीन घाई एक क्षण वाजे सनई एक क्षण अंतरपाठ एक क्षण रेशीमगाठ      मुहूर्ताचा हा क्षण जणु काही आनंदाचा क्षण  म्हणूनच हजर राहिले प्रत्येक जण  🌹🌹🌹💫💫🌹💫 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 सगेसोयरे इस्ट मंडळी येवून  शोभा वाढवावी मंडपाची     माथ्यावरती पडूद्या अक्षता  तुमच्या शुभेच्छा रुपी आशीर्वादाची  💐💐💐💐💐 🌺🌺🌺🌺🌺🌺🔥🌈 नवदाम्पंत्याच्या सहजीवनाच्या  नवपर्वाचा शुभारंभ  तुमच्या साक्षीने संपन्न होतोय , आपले आगमन हेच  आमच्यासाठी सन्मानाचे  आहे. 🎭🎭🎭🎭🎭 🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇 विवाह एक बंधन , एक कर्तव्य  एक नव नातं , एक जा...

आई प्रतिष्ठान काव्य पुष्प-१५४

Image
  ❄️आई प्रतिष्ठान,वाठार निंबाळकर,फलटण  ❄️ (वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा ) मातृत्वाच्या स्मृती जपण्यासाठी  आई प्रतिष्ठान स्थापिले  शिक्षणवारीच्या उपक्रमशिल  शिक्षकांना पुरस्काराने गौरविले ❗  कोविड काळात सामाजिक  बांधिलकीचा वसा घेतला  कोवीड योध्दांना सॅनिटायझर  मास्क आणि खाऊ वाटला ❗ निबंध वक्तृत्व स्पर्धा घेऊनी  मुलांच्या कलांना दिला वाव  सामाजिक बांधिलकी जपणारे  प्रतिष्ठान म्हणूनी झाले नांव❗ सणउत्सव सांस्कृतिक परंपरेचे  आॅनलाईन रक्षाबंधन विषयाचे      राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे  नेटके संयोजन झाले आयोजनाचे   ❗ माझे कुटुंब माझी जबाबदारी  आॅनलाईन प्रश्नमंजूषा दारी  सुयश मिळवलेले झाले सन्मानपत्राचे  मानकरी ❗ मानवतावादी दृष्टी ठायी  आपले कार्य प्रेरणादायी उठावदार कार्याच्या सर्जनशीलतेची कौतुकास्पद थाप शाबासकीची ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५४ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogsp...

महात्मा ज्योतिबा फुले काव्य पुष्प -१५३

Image
विनम्र अभिवादन         महात्मा ज्योतिबा फुले  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  समाधीचा जीर्णोद्धार करणारे   छत्रपतींच्या इतिहासाचा पोवाडा लिहिणारे    जातिभेदाला मूठमाती देणारे|| सामाजिक क्रांतिला  घरापासून सुरुवात करणारे  ज्ञानाची ज्योत पेटवून  पत्नीला शिक्षिका करणारे || बहुजनांच्या शिक्षणासाठी  ज्ञानाची कवाडे खुली केली  मुलींच्या शिक्षणासाठी  पुण्यात शाळा सुरू केली || समतेचा विचार आचरणात जोपासणारे  बहुजन समाजाचे महात्मा खरे  पिण्याच्या पाण्यासाठी   हौद खुला करणारे   पुरोगामी विचारधारा पेरणारे|| साहित्यातून वास्तव लेखन करणारे  शेतकऱ्यांचा आसूड मध्ये  शेतकरी जीवन व्यक्त करणारे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे || स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे  उच्चवर्णियांची मक्तेदारी मोडीत काढणारे क्रांतिसूर्य थोर समाजसुधारक  सामाजिक बांधिलकी जपणारे || काव्य पुष्प-१५३ 

वृक्षाचा नजारा काव्य पुष्प-१५२

Image
🌳वृक्षाचा नजारा🌴 गावाजवळील तलाव  शिगोशिग भरलेला दिसे  वृक्षाच्या फांद्यांचे  जलाशयात प्रतिबिंब दिसे  || वाऱ्याच्या हालचालीने  पानांची नक्षी जलावर दिसे  पाण्यात बुडलेल्या खोडाचे शेंडके  झुपकेदार दिसे|| वाकलेल्या खोडाचे  मजेशीर रुप दिसले त्याच्यावरुनी चालण्याचा मोह मनाला भुरळ घाले  || तोल सांभाळत खोडावरुनी   पटकन दोस्त पळत गेले तयावर उभे राहूनी  दिमाखात चित्रबध्द झाले|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५२ प्रतिक्रिया आदरणीय सर  आपल्या काव्यरचनाला तोड नाही.  अप्रतिम अशी रचना.  कोणताही विषय असो, चित्र डोळ्यासमोर दिसल्यावर कमीत कमी सोळा ओळी तरी कवितांच्या झाल्या म्हणून समजायचं . आपल्या लेखणीला सलाम..........🖋️🙏 श्री गणेश तांबे वाठार निंबाळकर फलटण

ग्रामोफोन काव्य पुष्प-१५१

Image
धांदिष्ठ्य मित्रांच्या मुशाफरीतील अकल्पित अवर्णणीय क्षण , "लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालय" पोसेवाडी खानापूर,येथील श्री भगवान जाधव यांच्या कडील ग्रामोफोन तबकडीवर ' हिमालय की गोदमे 'या सिनेमातील हिंदी गाणे "चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था" ऐकल्यावर सुचलेले काव्य..              *ग्रामोफोन मर्म बंधातील अनमोल चिजवस्तू  संग्राहक अवलियाने जपल्या    श्रवणीय गाण्याच्या झलकिने             गतकाळातल्या  स्मृती जागल्या | धनिकांच्या हवेलीत असलेला     आम्ही फक्त सिनेमात पाहिलेला   आज प्रत्यक्ष बघायला मिळाला  आणि आज आनंदीआनंद झाला| लाईट वीना बॅटरी वीना सुरू होणारा   केवळ हॅण्डेलवर ग्रामोफोन चालणारा  अवीट गाण्याची मैफिल सजवणारा  गाणी ऐकून मंत्रमुग्ध करणारा| तबकडीवर पीनचा ब्रश ठेवती  हॅण्डेल फिरवलाकी आवाज येती  पाहताना खरच अदभूत वाटती  गाणं ऐकताना देहभान हरती| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१५१ यापूर्वीच्या कविता व ...

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव काव्य पुष्प-१५०

Image
    विनम्र अभिवादन  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  राजकीय धुरंदर राष्ट्रीय लोकनेते  ज्ञानोपासक ,सुसंस्कृत व्यक्तिमत्व  पंचायत राज व सहकार जाणते ❗ आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कार्यपटलाची थोर किर्ती  पाहुनी समाधी स्मारक स्मृतीस्थळी  समस्त जन ,अभिवादना हस्त जोडती ❗ 'कृष्णाकाठ'आत्मचरित्रातील  जीवनातील अक्षरशिल्पे आठवूया  यशवंत विचारांचा वारसा घेऊन आपण समतेचे पाईक होऊया ❗ सह्याद्रीच्या छाव्याचे हिमालया सारखे  उत्तुंग व्यक्तिमत्व सर्वांना कळले  कृष्णा कोयनेच्या प्रितिसंगमा वरती   कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळे ❗ काव्य पुष्प-१५० श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काव्य पुष्प-१४९

Image
🖌️अष्टपैलू व्यक्तिमत्त्व🖋️ (श्री रमेश जावीर सर खरसुंडी ता.आटपाडी) छांदिष्ट्य समूहाचे अवलिया  काठ्यशिल्पातून सिध्दले कर्तृत्व दिलखुलासपणे सुसंवादती  विविधांगी पैलूंचे व्यक्तिमत्व | आपला व्यासंग आयुष्यभर जपती  काष्ठ्यशिल्पातून हितगुज साधती  चित्र शिल्पातून संमोहित करती  संग्राहकवृत्तीची सिध्दता पटती | वास्तवतेचे ज्वलंत अस्सल लेखन  होलिया वाजाप अन् सप्तरंगी कला  साहित्य आणि कला संग्रह  दालनातून  भावभावनांचे माहेरघर भेटले आम्हाला | चाणाक्ष नजरेने टिपलेल्या मुळखंडाला  पशुपक्ष्यांच्या काष्ठ्यशिल्पात आकारल्या   कर्तव्यभूमीच्या अनेक आठवणी  काष्ठ्य शिल्पातून मांडल्या| खडतर संघर्षमय नव्यावाटेने  जीवन समृध्दीचा कलारंग कला म्हणजे जीवन मानून  बनविला आयुष्याचा व्यासंग | याभेटीने सरांचे समजले अंतरंग  कलेचे उलगडले बहुढंग  लाभली लोकप्रियता उदंड कलेचा उपासक छंदात दंग| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१४९ या पुर्वाचे काव्य पुष्प व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

दीपमाळा काव्य पुष्प-१४८

Image
         दीपमाळा ( सदर दीपमाळ श्री सिद्धनाथ मंदिर,खरसुंडी ता.आटपाडी येथील आहे) श्रीसिध्दनाथ मंदिरा समोरी नजरेत भरती सप्तक दीपमाळा  राऊळाचे सौंदर्य खुलविती  तेवणाऱ्या दीपस्तंभी माळा|   सण उत्सवात प्रकाशाच्या   तेवती तेजोमय माळा शोभिवंत झळकला पणत्यांचा गोतावळा| एकावर एक दीप प्रज्वलले  त्याचा सोनेरी प्रकाशझोत परिसर उजळून निघे  रातीच्या काळोखात | प्रवेशद्वाराशी दीपमाळेचे दीपस्तंभ  देवदर्शनाचा झाला आरंभ  मनोभावे जाऊया राऊळात  खडीमुर्ती श्री सिध्दनाथाची  देवळात| काव्यपुष्प -१४८ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. click on  https://raviprema.blogspot.com श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

माळाचं सौंदर्य काव्य पुष्प-१४७

Image
🌿माळरानाचं सौंदर्य अनिलाच्या झोतावरी  भिरभिरणारी पाती  वाऱ्याचं गाणी गाती  ऊर्जेची साठवण करती || टेकडीच्या माथ्यावर  विणले जाळे पवनचक्क्यांचे  अपारंपारिक ऊर्जा स्रोत  बनले हुकमी एक्क्यांचे || वेगळी वाट तुडवत  टेकडीवर जाऊया  माळावरच्या तृणांतल्या  कुसळांची अग्रे निरखूया|| माळरानावरल्या गवतावरती  अंग झोकूनी जरा विसावलो  तलावातले जल पाहूनी  मनातल्या मनात चिंब भिजलो|| आम्ही फिरस्ते सह्याद्रीच्या कुशीतले   माणदेशीच्या भटकंतीला निघाले  वाटेतल्या दृश्य स्थळांनी मोहिनी घातली सौंदर्यांची टिपणं चित्रबद्ध केली || काव्य पुष्प १४७ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

तलाव क्षेत्र काव्य पुष्प-१४६

Image
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃        🍂तलाव क्षेत्र 🍂 दुष्काळी भागातील जलाचे साठे  निसर्गातील जीवजीवांचे पाणवठे  काठाकाठाने झुडपे वेढली  तवंगावर सावलीची नक्षी साधली || तळ्याच्या मधीच निष्पर्ण वृक्ष  समद्यांचे जाते त्याकडे लक्ष  क्षणभर होतं तरंगाकडे दुर्लक्ष मनात येते भेट घेऊ प्रत्यक्ष || सभोवताली पवन ऊर्जेचे खांब  पांढऱ्याशुभ्र रेघा दिसती लांब  अवजड पाती वाऱ्यावर फिरती  गतीज ऊर्जेचे रुपांतर वीजेत होती || पाण्यावर भाकऱ्या खेळायला  मजेशीर गंमत वाटती  वाऱ्याच्या वेगे जलावर  नाजुकशा लहरी उसळती|| काव्य पुष्प-१४६ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.click on https://raviprema.blogspot.com 🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃

पायऱ्यांची वाट काव्य पुष्प -१४५

Image
🍁☘️पायऱ्यांची वाट ☘️🍁 पायथ्यापासून माथ्यापर्यंत  दगडी बांधिव पायऱ्यांची वाट  दुतर्फा हिरव्यागार झाडांच्या ओळीत  पानांच्या मांडवाने सजली पायवाट|| झाडाझुडपांची गर्द छाया  चालताना अंगावर लाभते  कधी चढाई कधी सपाटी  यमाई गडावर घेऊन जाते || चौथऱ्यावर निवांत बसूनी शांतपणे क्षणभर विसावूनी  करुया परिसर न्याहाळणी  मनात करुया साठवणी || यमाई देवीच्या दर्शना जाऊया साक्षात्कारी रुप मनोभावे पाहूया  शांत चित्ताने समाधान लाभते  भावभक्तीने प्रसन्नता मिळते|| काव्य पुष्प-१४५ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. Click on https://raviprema.blogspot.com

सांजवेळ काव्य पुष्प-१४४

Image
  💥 सांजवेळ💫 शांत शीतल तिन्हीसांजच्या वेळी  पश्चिमेला आभाळी लाली  ढगांची लाल छटा माखली अस्ताचा रवी आसमंत उजाळी|| बिंब विलोभनीय झळकले  वृक्षराजीचे तोरण सजले  शिवाय हिरवाईत रंगले बहारदार पीक फुलले|| तेजोमय प्रकाश धूसर  होतो पुन्हा नव्याने उभारी घेतो  चराचरांना जैविकऊर्जा देतो   हे भास्करा तुला प्रणामतो|| तिन्ही सांजेला रुप  खुलते दिवाकराचे  दिसभराच्या कामातून  क्षणेक दृश्य बघण्याचे|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१४४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. Click on https://raviprema.blogspot.com

कवडसा तलावातला काव्य पुष्प-१४३

Image
🔰कवडसा🔰 जलतरंगावर कवडसे पडले आरश्यात मी निरखून पाहिले छबी पाहूनी मस्तच वाटले चेहऱ्यावरती हास्य उमटले  || जलातल्या खोडावर उभा राहूनी  दोस्ताला फोटो काढायला सांगितला अचंबित करणारे दृश्य पाहूनी   शिवसागर जलाशय आठवला||  खोड अन् फांद्या पाण्यात न्हाल्या  पानाफुलांच्या  रांगोळ्या उमटल्या  झाडांनी पाण्यावर छत्र्या धरल्या भटकंतीच्या उत्कंठा वाढवल्या || दोस्तांनी मारल्या उड्या मस्तच तलाव हाय गड्या मनमोहक तलाव परिसर  प्रसन्न ऊर्जेचा होई असर || काव्य पुष्प-१४३ १ नोव्हेंबर २०२० श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com प्रतिक्रिया प्रतिमा पाण्यातली,लटिंगे सरांच्या मनातली  श्री उध्दव निकम सर वाई निसर्ग पर्यटक व फोटोग्राफर

वेलाचा मांडव काव्य पुष्प-१४२

Image
वेलाचा मांडव सजलादारी घराच्या अंगणी परसबाग कोहळ्याचा वेल मांडवावरी फळांफुलांनी लगडला बहरला फळांचे तोरण सजले दारी | फळे टपोरी गोलाकार   पांढरी रंगछटा देखणीफार  वेलीचवेली परसबागेत वेलिंनी घेतले त्यांना कवेत | हिरव्यागार पानापानात वाढती उठावदार फळे शेंगा आणि फळभाज्यांच्या  संग दिसे भाजीचे मळे | भाज्यांचा उपयोग रसोईला सात्त्विक आहार जेवायला  घरच्या भाजीची चव चाखायला परसबाग फुलवा आपल्या घराला | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प-१४२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

दिवाळी पाडवा व भाऊबीज काव्य पुष्प-१४१

Image
💫💥दिपावली शुभेच्छा दिवाळी पाडवा व भाऊबीज दिवाळी पाडवा आनंदाचा  सणांचा राजा दीपोत्सवाचा  सुवासिनींनी पतीला औक्षण्याचा   पतीने पत्नीला भेटवस्तू देण्याचा|| नात्यांची जपणूक करुया  स्नेहाचे  संवर्धन वाढवूया  घर विद्युत रोषणाईने उजळूया घरटं दिव्यांच्याआरासीने सजवूया || आतषबाजीच्या ठिणग्या  आकाशी झेपावून उडती आतषबाजीने आकाश उजाळती रंगीत फुलदाणीचा पाऊस चमकती || नववर्ष म्हणून पूजन करती  व्यापारी रोजमेळ वह्यांचे देवादिकांना मनोभावे प्रार्थती व्यवसाय वृद्धिच्या समृद्धीचे|| बहिणीची भावावर माया मिळो त्याला प्रेमळ छाया ताई दादाचा पवित्र सण आनंदाने भरून आले मन|| मांगल्याचे नाते बहिण भावाचे  लखलखती दीप जिव्हाळ्याचे जपावे नातं निरामय भावनेने  जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१४१ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

दिवाळी फराळ काव्य पुष्प-१४०

Image
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮             दिवाळी फराळ सण आला दिवाळीचा  फराळोत्सवाच्या लगबगीचा  साखरेच्या पाकात बुंदी भिजली लाडू वळण्या एकत्र झाली || लाठलेल्या पातीत सारण भरुया फिरकीने अलवार नक्षी काढूया  मंद आचेवर करंजी तळूया  खरपूस भाजून शीग लावूया|| पोह्याचा खमंग चिवडा केला शेंगदाणे खोबरं डाळ तळली  मोहरी लसणाची खमंग  तडतड फोडणी घातली|| कडधान्यांचे पीठ घेतले  तिखटमीठ घालून मळले  शेवग्याने चकली बनवली उकळत्या तेलात तळली || कुरकुरीत खमंग भाजली  गरमागरम चवीनं खाल्ली    अनारसे खसखशीने सजले  कडकडीत गुळमाट झाले || घर आवलीने सजवूया  अंगणी रांगोळी रेखाटूया  गप्पांची मैफिल भरवूया  फराळावर ताव मारुया || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१४०

एक पणती दानाची काव्य पुष्प-१३९

Image
🏮एक पणती दानाची🏮 समाजातील संवेदना जाणवूया  आपल्याच बांधवांना मदत करुया  समाजभान राखून खारीचा वाटा उचलूया  सामाजिक बांधिलकीचा दीप तेवत ठेवूया || वंचितांच्या दारी दीप लावूया  त्यांची दिवाळी साजरी करुया नवचैतन्य मुखावर झळकू द्या    इतरांना हर्ष आनंद देवूया || पहाटेला सुरू दिवाळी सण    सुगंधी उटण्यानं करुया मार्जन   मोती साबणाने स्वच्छ झालं तन गारगरम पाण्यानं होईल स्नान||   कुंकूमतिलक कपाळी लेवून  पंचारतीने करुया औक्षण गरजूंना मदतीचा हात देवूया आपलं दान सतपात्री करुया ...... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१३९

चाचा नेहरू काव्य पुष्प--१३८

Image
बालदिन, पंडित जवाहरलाल नेहरू जन्मदिन | विनम्र अभिवादन     🌹☘️🌹☘️🌹☘️🌹     मुलांचे मनोगत                चाचा नेहरू कोटास शोभते गुलाबाचे फुल  त्यांच्या आवडीचे हसरं मुल  मुले म्हणजे भविष्य उद्याचे विकसनशील स्वप्न भारताचे|| आम्हीच  सभेचे संयोजन करतो 'बालदिन 'जन्मदिन साजरा करतो शाळेत बालसभा आयोजित करतो  आम्ही प्रतिमा पूजन करतो || चित्र रेखाटतो,रंगभरण करतो  त्यांच्या विषयी भाषण करतात पुस्तक वाचून निबंध लिहितो  काहीजण व्यक्तीरेखा साकारतात|| भारताचे पहिले पंतप्रधान  त्यांच्या कार्यास आमचा प्रणाम  डिसकव्हरी आॅफ इंडियाच्या  संस्कृती लेखकास माझा सलाम || काव्य पुष्प १३८  फोटो गेल्यावर्षीचा आहे....

सण दिपावलीचा काव्य पुष्प-१३७

Image
सर्व मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗  🍁🏮सण दिपावलीचा सजला आकाशकंदील घराला दिव्यांची रोषणाई घरदाराला रांगोळी सजली अंगणाला  फुलांपानांचे तोरण दाराला | दारी लावला आशेचा दीप  आसमंती झळकती कंदील  उटणे लेऊन झालं अभ्यंग स्नान नव्याने बांधला जरीचा मंदिल | धनत्रयोदशीला पूजा धन्वंतरीची  आरोग्यदायी निर्मळजीवनाची  पूजा करुया धन-धान्याची  घराला बरकत  मिळण्याची| अभ्यंगस्नान नरक चतुर्दशीला श्रवणीय गाणी ऐकू पहाटेला  चैतन्याचे तेजोमय दीप लावूया  विवेकदीप मनांमनात लावूया | निराशेची तमा नाहिशी करुया  सकारात्मक विचाराची कास धरुया  खमंग फराळावर ताव मारुया नवीन वस्त्रे परिधान करुया | आश्विन अमावस्येला  कुबेर लक्ष्मी पूजायला  पंच पकवान्न नैवैद्याला  लाह्या बत्तासे वाहायला| काव्य पुष्प १३७ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

दिपावली काव्य पुष्प-१३६

Image
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗  🏮💥💫💫💥🏮           दिपावली प्रकाशाचे पूजन करणारी  पणत्यांनी घर उजळवणारी  रंगांची उधळण करणारी  नात्यांची जपणूक करणारी || अमाप उत्साह वर्धित करणारी  आनंद द्विगुणित करणारी  नवचैतन्याची ऊर्जा देणारी  रांगोळ्यांच्या नक्षीने सजणारी ||  रित्या ओंजळीत दान देणारी  सुखसमृद्धीची उधळण करणारी  आकाशी कंदील प्रज्वलित करणारी  आसमंत उजळून टाकणारी || फराळोत्सवाने स्नेह वाढविणारी  नव्या वस्त्रांनी रुप खुलविणारी  नातेसंबंधाची जपणूक करणारी  स्नेह अन्  मैत्री संचित करणारी|| आपली समृद्धी द्विगुणित करणारी अन् इतरांना आनंद सुख  वाटणारी  समाजभान राखून सहकार्य करणारी  एक पणती सतत तेवत ठेवणारी || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१३६

दिवाळी कीट वाटप

Image
 🏮एक दिवा सामाजिक बांधिलकीचा तेवत ठेवूया🏮 संवेदना जाणवूया ,आपल्याच बांधवांना मदत करुया | समाजभान राखून खारीचा वाटा उचलूया |  〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  सामाजिक कार्य  करण्याची प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शकश्री एच.व्ही.जाधव साहेब,श्री कमलाकांत म्हेत्रे साहेब व श्री सुधीर महामुनी साहेब  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त " दिवाळी कीट " प्रत्यक्ष वाडीवस्तीवर जावून वाटप करण्याचे काम दरवर्षी केले आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकातील कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या शिक्षकमित्र परिवारातील मित्रांच्या वतीने वंचित घटकातील आपल्याच बांधवांची दिवाळी गोड होण्यासाठी या वर्षी  कातकरी समाजातील  २५ कुटूंबियांना ''दिवाळी कीट,व साडी" अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोमधरण जलाशयाच्या काठावरील वाशिवली,कोंढावळे, उळुंब-बलकवडी व मालतपूर येथील वस्तीवर प्रत्यक्ष जावून साहित्य वाटप श्री सहदेव फणसे,श्री भ...

वसुबारस काव्य पुष्प -१३५

Image
   🐂 वसुबारस    गोधनाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस... गाय आणि वासराच्या अंगी असणारी वात्सल्य, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपल्यास लाभो....         वसुबारस गाईचा गोऱ्या  शेतकऱ्याचे धन बारशीला करा  गाईचे पूजन|| फुलमाळा घालून  ओवाळणी करूया कृतज्ञतेने सन्मानित  गोधन करुया ||  कृषकांचा सुदिन  गोधनाला समर्पित  उपकाराच्या जाणिवाने  हर्षोल्हासाने अर्पित|| बाजरीची भाकरी  गवारीची भाजी  नैवेद्यंम समर्पयामि  वाद्यांचा गजर वाजी|| गाय वासरू  समृद्धीचे प्रतिक प्राणीमात्रांचे  करुया कवतिक|| दिवाळी सणाची  झालिया सुरुवात  सुखसमाधानाची  होऊद्या भरभराट || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१३५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

मनपसंत थाळी काव्य पुष्प-१३४

Image
🍲 मनपसंत थाळी  🍛  सामिष भोजनाची   मांसाहारी थाळी मनपसंत जेवणाची लज्जत वाढली | झणझणीत तांबडा  गावरान रस्सा मधीच फुरकायला  अळणी  रस्सा | चटकदार दमबिर्याणी  लाजवाब चवीची  कडक पापूड्याची भाकरी चुलीवरची| पाट्यावर वरवंट्याखाली  रगडून बनलेला मसाला  चुलीवर रटरठ शिजलेला रस्सा  भाकरी कुस्करून खाल्ला काला| घरगुती जेवणाचा थाट  इथेच्छ भोजन घडविते  घरच्यांच्या हातच्या जेवणाची चव  कायमच् जिभेवर रेंगाळत राहते | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१३४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

मनाचं भटकणं काव्य पुष्प-१३३

Image
🍁🦋 मनाचं भटकणं🦋🍁 मन माझं होई पाखरु स्वैर आकाशी संचारी  मन माझं होई लेकरु  खेळण्याचा हट्ट धरी  मन माझं होई कोकरु  अवखळ उड्या मारी  मन माझं होई शिंगरु  दुडक्या चालीने फिरी  मन माझं होई वासरू  अल्लडपणा करी  मन माझं  होई फुलपाखरु  फुलांवर स्वच्छंद फिरी  मन माझे होई जलाशय  तरंगावर भाकऱ्या करी  मन माझं होई गार वारे तनाला मोहित करी  मन माझं होई जलधारा  शिवाराला चिंब भिजवी  मन माझं होई जंगलवाटा  कड्याकपारीत फिरवी   मन माझं होई रानफुले  नाना रंगछटेचे उधळण करे मन माझे होई तृणपाती  वाऱ्यासंग  नाच करे मन माझं होई अस्वस्थ  मग काही सुचत नाही  मग पावलं वळती निसर्गात  भ्रमंतीने थकवा दूर राही  काव्य पुष्प-१३३ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

फुलांचे ताटवे काव्य पुष्प-१३२

Image
फुलांचे ताटवे  सायंकाळी फिरताना कडेला ताटवे  दिसले  गर्द तांबडे गुलदस्ते  नजरेत भरु लागले 🌸 अडगळीच्या गचपनाला सुमने शोभिवंत करती  गवतफुलांच्या झाडातून  गेंददार फुले उसळती  🦋 तांबड्या  सुमनांची नक्षी  हिरवाईच्या चटईवरती  सणवारांचे करण्या स्वागत  त-हेत-हेचे रंग उधळती 🌸 हर्ष आनंदाची प्रतिक फुले निसर्गसृष्टी  सजविती  गंध सुगंध रंग देवूनी  माला गुच्छ तोरणं लगडती 🍁 काव्य पुष्प-१३२ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

पावसाचा रट्टा काव्य पुष्प-१३१

Image
🌧️पावसाचा रट्टा🌧️ परतीच्या पावसानं अक्षरशः रडवलं पीक हातातलं मातीमोल केलं || आकाशात मेघ गर्जत आले  वीजांचे तांडव सुरू झाले   चमचमाट लखलखाट झाले  परतीच्या पावसाने थैमान घातले || शिवारात पाणी साचलं  ऊस,भात मका ज्वारी  बाजरी भुईसपाट झाल्याने  पाऊस आता पोटाव मारी || हाता तोंडाशी आलेला घास वाया गेल्यानं  आवळला फास || चिंब भिजायला खुणवायच्या  आकाड सरावणातल्या जलधारा  बेफाम चिक्कार कोसळल्या  आश्विन मासातल्या धुवाॅधारा|| समदीकडे झालीय दैना त्यामुळे वावराचा तलाव झाला वरुणराजा आता तरी थांब  सततच्या वर्षावाने वैताग आला|| काव्य पुष्प -१३१ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

ग्रंथ आपले मित्र काव्य पुष्प-१३०

Image
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ 📚ग्रंथ आपले मित्र📚  छंद माझा आवडता वाचणं  पुस्तक,पेपर,पत्रे,मासिकं ग्रंथ वाचून ज्ञान मिळवणं आजन्मभर विद्यार्थी रहाणं | आनंदानुभव पुस्तकांच्या सहवासात ग्रंथ आपल्याला ज्ञानी बनवितात मग शब्दभांडाराची वाढते क्रेझ  वाचल्यावर आपण होतो फ्रेश| कर्तृत्वाच्या महतीसाठी चरित्रं वाचावे  ज्ञान माहितीसाठी शब्दकोश वाचावे  मनोरंजनासाठी कादंबरी काव्य वाचावे ताज्या घडामोडीसाठी वर्तमानपत्र वाचावे | पुस्तकाची अनमोलभेट देवूया   वाचनसंस्कृतीला हातभार लावूया  साहित्यकलेचे अवघे भांडार वाचायला मिळती नानाविध प्रकार | पुस्तक वाचण्याने मित्र जोडले  लेखक कवी समीक्षक भेटले  वाचनाने विचाराला चालना मिळाली लेखनाची अभिरुची विकसित झाली|  श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प -१३०

भाजी मंडई काव्य पुष्प-१२९

Image
🥦 भाजी मंडई 🍅     भाजी घ्या भाजी     ताजी ताजी भाजी काकडी घ्या काकडी  हिरवी हिरवी काकडी || मुलांनी अंगणात बाजार मांडला शेतातला भाजीपाला आणला  रानातला हरभरा आणला  परसबागेतला पापडी शेवगा आणला || मळ्यातल्या फळभाज्या आणल्या  काहींनी कटलरी वस्तू आणल्या  घरीच बनवले खारं शेंगदाणे  चिक्की, लाडू बर्फी फुटाणे|| चाकवत मेथी कांदे बटाटे  बोरं आणि चिंचेचे छोटे वाटे  खरेदी करण्या धांदल उडाली  पहिल्यांदा मुलांची भंबेरी झाली  || पालकांची गर्दी कोथिंबीर  कांद्याला  तीन लिंबं पाच रुपयाला  गावरान इंद्रायणी तांदूळाला गर्दी झाली बघून घ्यायला || मुलं झाली विक्रेते  पालक झाले घेवारी  करु लागले खरेदी  भेळ फरसाण पाणीपुरी|| व्यवहारज्ञानाची माहिती  कृतीतून घेती अनुभूती  शेजारच्या शाळा भेट देती आवडता खाऊ विकत घेती ||  सर सर भाजी घ्याना भाजी  मुलांनी लडिवाळ विचारणा केली फळे भाज्या खाऊ नाना  तांदूळ लाडू  चिक्की घेतली || व्यवहारीक अनुभव म्हणून उपक्रम केला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळ...

बहारदार वृक्षराज काव्य पुष्प-१२८

Image
बहारदार वृक्षराज डेरेदार वृक्षराज पाहुनी  तनमन प्रसन्न झाले. झाडाच्या पारावर बसूनी गप्पांचे इमले मनी आले | सूरपारंब्या झाडावरच्या खेळताना मजा यायची  कैरी चिंचा बोरं पाडताना  जिवलगांची साथ मिळायची | वृक्षराजी परोपकार करती  फळं फुलं काष्ठ पानं वाटती  निसर्ग सौंदर्याने रुप सजती  दृश्यमानाने मन रिझती | वृक्षराजी वनसंपदा निसर्गाची  थंडगार वारा छाया मायेची पीकं कसदार थोरवी रानाची भरलेल्या सुवासिक ओंब्यांची| काव्य पुष्प-१२८ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई फोटो साभार श्री राजेन्द्र बोबडे

गंधसुगंध काव्य पुष्प-१२७

Image
🍂 गंधसुगंध 🍂   गुलाब सोनचाफ्याचा  सुवासिक गंध दरवळला  टवटवीत गंधित फुलांनी  शोभा आली तबकाला || गुलाब पुष्प प्रतिक प्रेमाचे  एकमेकांना आनंद वाटते चाफा जणू अत्तराची कुपी  गंधसुगंध दरवळत ठेवते|| अग्रमानांकन गुलाबाला  चाफ्याचा गंध दरवळला फुलांची परडी देवपूजेला गुच्छ माळा स्वागताला|| रंगगंधाची उधळण  करतात मनाला तजेला देतात  तोरणं  रांगोळ्या सजतात  उत्सवाचा माहोल निर्मितात || श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१२७ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

झाडं वेलींचे दृश्य काव्य पुष्प-१२६

Image
☘️ झाडं वेलींचे दृश्य☘️ दररोज  सायंकाळी फिरण्याच्या वाटेवरी  दररोज विसावतो  पुलाच्या कठड्यावरी ❗ सहजच निवांत बसल्यावरी  अचानक मागे वळून पाहिले  सुंदर दृश्य तिन्हीसांजेला  झाडाझुडुपांचे दिसले ❗ वडाची  बाकदार कमान  खोडांची ऊंची एकसमान  झुमकुळ्याचा पारंबीला मान  कळकाची गुढी दिसे छान❗ नदी ओढ्याच्या काठी  झाडं वेली  फोफावती  किडं पाखरं निवासती जैविक साखळी रक्षती ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१२६

निसर्ग सहवास काव्य पुष्प-१२५

Image
☘️ 🌿☘️🌿🌱🌿🌱             निसर्ग सहवास भाळलो निसर्गाच्या रुपावरी  जरा विसावू गवतावरी   आनंदाची घडती वारी  सहवासाची गंमत खरी | हिरव्यागार झाडांशी वारं गंमत करतं गवतावर उंडारणारी  फुलपाखरं  दिसतं| ढगाळ हवामान हवेत उकाडा  पावसाची रिमझिम जलबिंदूचा सडा| निसर्गाचा सहवास  मनाला तजेलतो  आनंदाच्या उकळ्या मनात  फुटवतो| हास्याच्या रुपात  मैत्रीला दाद देतो आनंदाचे क्षण साजरे करतो| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१२५ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

औषधी वनस्पती काव्य पुष्प-१२४

Image
🌱 औषधी वनस्पती🌱 सडकेवरुन जाताना  या फळांकडे नजर वळे      झाडाला लगडली  दुधीभोपळ्यासारखी फळे 🌳 उंच झाडाची गर्द छाया  कमानीदार वाकल्या फांद्या  वाटसरुला देते सावलीची माया  नवल वाटे फळांचे समद्या 🌳 सौंदर्यप्रसाधनं करायला  झाडाचा उपयोग  वन्यप्राण्यांच्या खाद्याला फळांचा उपयोग 🌳 दुतर्फा झाडांच्या ओळी  सावलीचे छत्र देती  परोपकाराचे दातृत्व  झाड झुडपं दाखवती 🌳 जसे दिसते झुंबर लटकते   वजनदार कंद वाऱ्याव डुलते  हिंदीत बोलतात बालमखीरा  अमृत संजीवनी उपयोग खरा ❗ (या फळाचे भारतात प्रचलित नांव फाणूस आहे.) श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१२४ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com