निसर्ग सौंदर्य कविता ७६

निसर्ग सौंदर्य डोंगरपाडा गगनी मेघांची दाटी ढगांचं पुंजकं फिरती झोंबणाऱ्या गार वाऱ्याशी जलधारा बेंबळ करती || घनदाट जंगल डोंगरराणी धरेची देखणी हिरवीपैठणी सजली नव्या रुपात अवनी ऊन पावसाचा मासश्रावणी || नुकतीच झालीय भात लावणी खाचरात साठलय चिखलपाणी वारा,जलधारेची ऐकूया गाणी खंडीनं पिकूदे धानाच्या गोणी || कौलारू घरांची वाडी नजीकच शेती बाडी सोबतीला डोंगरदऱ्या स्वच्छ हवा वाटणाऱ्या|| श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ७६ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी https://raviprema.blogspot.com