शेतीचा हंगाम काव्य पुष्प-१६३
🌿🌱🌴🌿🌱🌴🌿
सुगी(हंगाम)
आभाळ भरले
मेघ दाटले
वारा सुटला
पाऊस आला|
थेंब टिपकले
मोती झाले
जमीन भिजली
कुळवणी केली|
गंध दरवळला
वापसा आला
बीजपेरा केला
पाऊस आला|
बीज अंकुरले
शिवार फुलले
कोळपणी झाली
खुरपणी केली|
धारा नाचू लागली
फुलोऱ्यात पिकं आली
सुगंध दरवळला
शेतकरी आनंदला|
मशागती केली
संजीवनी दिली
घाम गळला
धरेला मिळाला|
पाखरांचे फिरणे
फुलपाखरांचे भ्रमणे
परागसिंचन झाले
शिवार फुलले|
शेंगा दिसती
दाणे पोसती
शेंगा भरती
सोनेरी दिसती|
सुगीला सुरुवात झाली
काढणीला रोजगारी केला
एकाएकी वारा सुटला
हवेत बदल झाला|
आभाळ गरजले
नभ कोसळले
धोपटवणी पडले
तळे साचले|
पीक भिजले
काही नासले
खराब झाले
उन् पडले|
उरलेले काढले
वाळवले रचले
राखनी केली
मळणी केली|
पाखडणी केली
वाळवणं केली
रास लागली
पूजा केली|
सुगी(हंगाम)
आभाळ भरले
मेघ दाटले
वारा सुटला
पाऊस आला|
थेंब टिपकले
मोती झाले
जमीन भिजली
कुळवणी केली|
गंध दरवळला
वापसा आला
बीजपेरा केला
पाऊस आला|
बीज अंकुरले
शिवार फुलले
कोळपणी झाली
खुरपणी केली|
धारा नाचू लागली
फुलोऱ्यात पिकं आली
सुगंध दरवळला
शेतकरी आनंदला|
मशागती केली
संजीवनी दिली
घाम गळला
धरेला मिळाला|
पाखरांचे फिरणे
फुलपाखरांचे भ्रमणे
परागसिंचन झाले
शिवार फुलले|
शेंगा दिसती
दाणे पोसती
शेंगा भरती
सोनेरी दिसती|
सुगीला सुरुवात झाली
काढणीला रोजगारी केला
एकाएकी वारा सुटला
हवेत बदल झाला|
आभाळ गरजले
नभ कोसळले
धोपटवणी पडले
तळे साचले|
पीक भिजले
काही नासले
खराब झाले
उन् पडले|
उरलेले काढले
वाळवले रचले
राखनी केली
मळणी केली|
पाखडणी केली
वाळवणं केली
रास लागली
पूजा केली|
कणगीत भरले
गर्जेपुरते ठेवले
बाजारी धान नेले
घेेेवाऱ्याला विकले|
बाजारी धान नेले
घेेेवाऱ्याला विकले|
धान्याचा पैका मिळाला
उदरनिर्वाहाला वापरला
सलाम करुया अन्नदात्याला
त्याच्या काबाडकष्टाला |
उदरनिर्वाहाला वापरला
सलाम करुया अन्नदात्याला
त्याच्या काबाडकष्टाला |
विदारक परिस्थितीची सत्य कथा
आशयघन शब्दात गुंफली व्यथा
शेतकऱ्यांच्या घामाची गाथा
तिथं नमितो माझा माथा|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१६३
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
फोटो सौजन्य--गुगल
सुंदर वर्णन
ReplyDelete