रविंद्रकुमार गणपत लटिंगे प्राथमिक शिक्षक
ओझर्डे ता.वाई जि.सातारा
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
ग्रामीण भागातील कुमारी वैष्णवी सुजाता विजय ढोकळेची यशाची बिरुदमाला — पहिल्याच प्रयत्नात ‘राजपत्रित अधिकारी’ पदावर निवड.... परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर कुमारी वैष्णवी विजय ढोकळे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाची सुवर्णकीर्ती मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग -१ या पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या अभिमानास्पद यशामुळे ओझर्डे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे ता.वाई येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण पतितपावन विद्यामंदिर,ओझर्डे येथे पूर्ण केले.प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही ती जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली होती. पुढील इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण कलासागर अकॅडमी वाई येथे घेतले तर उच्च शिक्षणातील पदवी तिने सांगली येथील नामांकित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक (कंप्युटर सायन्स) मध्ये पदवी प्राप्त केली. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही वडील एस.टी. डेपो वाई येथे मेकॅनिक म्हणून काम करत अ...
साक्षीशिल्प येथे होम मिनिस्टर कार्यक्रम बहारदार वातावरणात हास्यमस्करी करत साजरा झाला. साक्षी शिल्प दुर्गामाता सार्वजनिक उत्सव सन 2025 आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी खास होय मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रितम लोखंडे,यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सावंत वहिनी, ग्रामपंचायत सदस्या सौ शैला मालुसरे वहिनी,सौ दिपाली मालुसरे,चैत्या फेम रिलस्टार आदिनाथ जाधव ,नेल आर्टिस्ट कु.श्रुती जाधव, वेबसिरीज स्टार विजय राऊत आणि प्रायोजकांचे व्यासपीठावर आगमन फटाक्यांच्या आतषबाजीत झाले. मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्गामाता प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाला. सर्वांचे हार्दिक स्वागत गीतसुमनाने बालचमुंनी केले. तदनंतर सर्व अतिथी मान्यवरांचे स्वागत ‘सन्मानचिन्ह’ देऊन आयोजकांच्या हस्ते करण्यात आले.हॉटेल व्यावसायिक श्री अमर गायकवाड, प्राध्यापक नितेश ससाणे आणि सरपंच सावंत मॅडम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला. मिमिक्री कलाकार राउत याने सिनेजगतातील व राजकारणी ...
गावच्या आठवणी ओझर्डे सोंगे उत्सव - April 17, 2020 ओझर्डे सोंगे उत्सव,सोंगाडी गाव ओझर्डे १६ मार्च। २०१७ शिमग्याची सोंगं 😿आस्ते कदमसे बिलांगकोट राज्यत राज्य स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य या उद्घोषणेचा गजर करीत सुरू होणारा व गावचे दैवत श्री पद्मावती मातेच्या आशिर्वादाने ओझर्डे गावची लोककला सोंगे उत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे मुख्य मिरवणूक सोहळा सुरू होतो..होळी पौर्णिमे पासून या उत्सवाला सुरुवात होते. 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸 महाराष्ट्रात प्नसिध्द श्री भैरवनाथाच्या बगाडयात्रेच्या पहाटे ओझर्डे येथे प्रबोधनात्मक व रंजनात्मक सोंगे उत्सव संपन्न होतो .सोंगे म्हणजे चित्ररथ, शोभायात्रा मिरवणूक होय. ओझर्डे गावचा कॉर्निव्हल सोहळाच जणू.हा उत्सव रंगपंचमीच्या पहाटे सूरू होतो. .होळीपासूनच सुरुवात होते.कोणकोण कोणत्या गाडल्या बांधणार यांचे नियोजन केले जाते....
जबरदस्त
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete