काव्य पुष्प-२४१ दरड




दरड

 उच्चांकी अतिवृष्टीने

 कोसळल्या दरडी 

 वेगाचं खढूळ पाणी  

 पाषाणाला खरडी


वस्तीतील घरांच्या 

आवळल्या नरडी 

जीवाच्या आकांताने 

आप्तस्वकिय ओरडी


लोकांच्या मदतीने

भरली माझी परडी

कैक हात झटू लागले 

नवी वसवण्या वाडी


लोकांनी समाजभान जपले

मदतीला अनेक हात सरसावले

पुन्हा नव्याने संसार मांडायला 

उमेदीने आधाराचे बळ मिळाले


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड