काव्य पुष्प-२४६रानफुलांचे नंदनवन कास पठार
रानफुलांचे नंदनवन
कासपठार साताऱ्याचे
सौंदर्य पुष्पवैभवाचे
पारणे फेडणाऱ्या
मनमोहक रंगछटांचे
बहरला रानफुलांचा
चित्ताकर्षक रंगोत्सव
नाजुकसा शोभिवंत
रंगबिरंगी फुलोत्सव
फुलत्या फुलांची झलक
मनाला मोहिनी घालते
पठारावरचा स्वर्ग फुलांचा
पाहूनी मनमयूर नाचते
गोंडस रानहळदी संगती
दुधाळ सफेद दीपकाडी
गेंद चवर भुई-कारवी
सोनकीची पिवळी साडी
खुलला जांभळा तेरडा
इवल्या निल अभाळी नभाळी
गेंद गौरीहराची नागफणी
गालिच्या कारवीचा मखमली
दिनांक २२ अॉगस्ट २०२१
काव्य पुष्प-२४६
Comments
Post a Comment