भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव२० २१
🍁☘️स्वकुळ साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जयंती उत्सव छोटेखानी समारंभात साजरा करण्यात आला. सूर्योदया पूर्वी पाळणा गीत गायन करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तदनंतर अध्यक्ष श्री भास्कर कांबळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली व संध्याकाळची आरती माजी उपाध्यक्ष श्री भगवान गवते यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे अवचित्य साधून समाज भगिनी सौ सोनाली तुषार कोदे यांना स्वावलंबन फाऊंडेशन,पुणे यांचे वतीने अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान केल्याबद्दल जेष्ठ भगिनी सौ शैलजा बारगजे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभर भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांची पूजाअर्चा श्री रघूनाथ दाहोत्रे आणि कुटूंबिय करत असतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणेसाठी सल्लागार श्री दत्तात्रय मर्ढेकर यांच्या हस्ते कुटूंबियांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी हिरवी पाती काव्यसंग्रह आणि पाऊले चालती प्रवासवर्णन अशी दोन पुस्तके प्रकाशित केलेबद्दल अध्यक्ष श्री भास्कर कांबळे यांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच सर्वासाठी प्रसादाचे व पुस्तक स्नेहभेट देण्याचे नियोजन रवींद्र लटिंगे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.रमेशचंद्र बारगजे सरांनी केले. आभार श्री स्वप्निल दाहोत्रे यांनी मानले. या कार्यक्रमास भास्कर मर्ढेकर, अजित हावरे, वंदना हावरे, शकुंतला मर्ढेकर (बाई), विजया कांबळे, योगेश दाहोत्रे, आनंदा सुकाळे ,तुषार कोदे, योगेश पोरे, भगवान गवते, रमेश भागवत, राजेंद्र लुंगे व साळी समाज बांधव उपस्थित होते.
https://www.facebook.com/100017414838217/posts/897292964194523/?flite=scwspnss
Comments
Post a Comment