काव्य पुष्प- २४२पुस्तक परिचयाची सेंच्युरी
(श्री गणेश तांबे सर राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कार ''वाचनसाखळी फेसबुक"समूहाच्या वतीने प्रदान करुन गौरविण्यात आले.)
पुस्तक परिचयाची शंभरी
करुनी पुस्तक परिचय
आशयघन शब्दाने
शतक साजरे झाले
साहित्यिकांच्या ग्रंथाने
समर्पक शब्दांचा साज
ओजस्वी शब्दांची गुंफण
वेचक वेधक शब्दात वर्णन
अस्खलित सुंदर शब्दांकन
वाढवली परिचयाने उत्कंठा
ओळख झाली लेखक कवींची
करून वाड्मय क्षेत्रांना स्पर्श
रुजविली वाट सृजनशीलतेची
निढळ आहे आपली शब्दांवर भक्ती
आपल्या शब्दशिल्पास सलाम
वाचकांची होते पुस्तक वाक् तृप्ती
आपल्या लेखनीस त्रिवार सलाम
पुस्तक परिचयाच्या मेजवानीने
रसग्रहणाची गोडी लागली
लेखमाला वाचताना प्रत्यक्ष
पुस्तकवाचनाची प्रचिती आली
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक १५जुलै २०२१
Comments
Post a Comment