काव्य पुष्प-२४५ जलप्रपात







जलप्रपात

नभांगणातील मेघ 

नजरेत जवा भरले  

हसऱ्या चेहऱ्यावर

तवा चैतन्य झळकले


कड्याखाली धबधबा 

ओसंडून वाहतोय 

आवेगाने तनमनाला

मनसोक्त भिजवतोय 


वायु लहरींच्या जोशाने

उडती दुधाळ फवारे

दर्शती तुषार कारंजे

जलथेंबांचे रुपच न्यारे


जलधारेचा एकसूरी नाद 

कर्णोपकर्णी सदा घुमतो

हर्षाचा रिमझिम पाऊस 

अवखळपणे बरसतो 


जलप्रपात न्याहाळताना 

आठवण मनी तराळली  

त्या दिवसाच्या रौद्ररूपाची 

थराकता लक्षात आली 


दगडधोंडे लोंढ्याच्या आवेगाने

झाली कडेलोट शेतीभातीची

दरडीच्या पाऊलखुणा पाहूनी

जखम भळभळली  वेदनेची


दि.८ऑगस्ट २०२१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड