काव्य पुष्प-२४४ भगवान श्री जिव्हेश्वर
||भगवान श्री जिव्हेश्वर||
श्री जिव्हेश्वरांना करतो वंदन
आम्ही स्वकुळ साळी नंदन
मनी असे जिव्हाजींचे मंथन
ललाटी सुगंधी लेप चंदन
जिव्हेश्वराचे आम्ही साळी
विणू विश्वात प्रेमजाळी
शिनू स्वबळे सर्वकाळी
मनोभावे दर्शन देवालयी
जिव्हेतून निर्मिक जिव्हेश्वर
आद्य वस्त्र निर्मिक शिवहर
सदैव करतो भक्तीचा जागर
समस्त स्वकुळ साळी परिवार
जिव्हेश्वराचा प्रात:काळी जन्मोत्सव
स्वकुळ साळी समाजाचा आनंदोत्सव
साळी माहात्म्याचा पारायण उत्सव
आनंदमेळा गुणगौरव प्रसादीउत्सव
विधी निर्मिता श्रीहरी अन्नदाता
सदाशिव हा सृष्टीचा सहाय कर्ता
तसा स्वकुळ हा जगाचा वस्रदाता
भगवान श्री जिव्हेश्वर वस्त्रनिर्माता
धागा धागा अखंड विणूया…..
सारे साळी एक होवूया …..
भगवान श्री जिव्हेश्वर महाराज की जय
Comments
Post a Comment