काव्य पुष्प -२४० अण्णाभाऊ साठे
जग बदल घालूनी घाव
सांगून गेले मज भीमराव
शोषितांचे आक्रोश शब्दातून मांडणारे
लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे
शब्दांच्या अंगाराने मनाला चेतविणारे
साहित्य सम्राट लोकशाहीर कादंबरीकार
अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन!
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे
शोषितांचे आक्रोश शब्दांत सजले
त्यांचे कलापथकात पोवाडे गायले
कष्टकऱ्यांच्या जीवनातील पैलूंचे
लोकनाट्यातून दर्शन घडविले ||
अक्षर शब्दांशी इमान राखून
जगले शब्दांच्या सहवासात
उपेक्षित वंचितांच्या जगण्याचे
साकारले प्रतिबिंब कादंबऱ्यात ||
गावाकडच्या मैनेची खंत
छक्कड लावणीतून मांडली
अभिजात साहित्यकृतींनी
भाषांची सीमा ओलांडली ||
उपेक्षितांचे जीणं जगणाऱ्या
व्यक्तीरेखांना गुंफले शब्दात
जीवनासाठी झगडणाऱ्या
वेदनांना आणले प्रकाशात ||
अहो अक्षरज्ञानाचा गंधही नसता
साहित्याचा डंका विश्वात गाजला
फकिरा,वारणेचा वाघ या कथांनी
उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेतला||
मराठमोळ्या शैलीतील
साहित्य संपदेचे माहिर
क्रांतीची ठिणगी पेटविणारे
वारणेचे वाघ लोकशाहीर ||
श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे
मु.पो.ओझर्डे ता.वाई जि.सातारा
पिन-४१२८०३
मोबाईल ७०८३१९३४११
Comments
Post a Comment