कविता संग्रह हिरवी पाती







मनोगत

कोरोना संसर्गापासून सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन झाले.जैसे ते परिस्थितीत सगळं स्थिर झालं.घरातच ठाण मांडून बसावे लागले.चळवळ्या लोकांना जखडल्या सारखं झालं.घरीच बसून करावे काय?हा यक्ष प्रश्न नजरेसमोर उभा ठाकला.टी.व्ही.किती वेळ पहायचा,वर्तमानपत्राची पानं कितीवेळा चाळायची, घरच्या वाचनालयातील पुस्तके कितीवेळ वाचत राहणार,फेसबुक आणि व्हाटसअपवर कितीवेळ चॅटिंग करणार.मनाची उलघाल व्हायची.सगळं दैनंदिन रुटिनच बदललं.काळाबरोबर समायोजन साधावं लागलं.

  अशा सैरभैर वेळी पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे आणि केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे सरांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.तुमचे छंद जोपासा.लेखन आणि वाचनातून अभिव्यक्त व्हा.तुमच्या अविष्कारासाठी उपक्रमशील,छांदिष्ट आणि शिक्षक हितगुज समुहावर तुमची लेखनशैली बहरु द्या.असा मित्रत्वाच्या नात्याने मौलिक सल्ला देवून लेखनातून व्यक्त होण्याची उर्मी निर्माण करण्याची प्रेरणा दिली.एका आशेच्या किरणाला प्रेरणा मिळाली.

जमतयका बघूया म्हणून जुने फोटो चाळताना साठवणीतल्या आठवणी जाग्या झाल्या.तदनंतर आत्तापर्यंतच्या झालेल्या भटकंती वर लेखन करायला सुरुवात केली.वाचक मित्रांच्या कौतुकास्पद प्रतिक्रियेने आणि श्री सुनील शेडगे सरांच्या प्रवास वर्णनं कसे करावे.बारकावे लेखनीबध्द कसे करावेत याच्या मार्गदर्शनाने भटकंती बहरत गेली.तदनंतर सहजच फोटो चाळत असताना फोटोतील भाव एकोळीत करायला येतायत का म्हणून विचारचक्र सुरू झालं.निसर्गातील भटकंतीचे अनेक टिपलेले फोटो फेसबुकवर होते.त्यावर रचनावादी पध्दतीने मुलं शब्द,चित्रांवरुन गोष्टी आणि कविता बनवितात.त्यानुसार आपणही प्रयत्न करुन पाहूया म्हणून एकोळी पासून चारोळी करत करत चार कडव्यांची काव्यरचना स्वत:ला आनंद मिळावा म्हणून रचत गेलो.ग्रुपवर आणि फेसबुक शेअरिंग करु लागलो.

रसग्रहण करून आनंद घेणाऱ्या रसिक वाचक मित्रांच्या प्रतिक्रियेने उर्मी मिळत गेली.वेळेचाही सदुपयोग होऊन छंदाची जोपासना होऊ लागली.अन् त्यातून विहंगम निसर्ग सौंदर्याची काव्यपुष्पे गुंफत गेलो.अनेकांच्या प्रेमळ आणि कौतुकास्पद हितगुज करुन कविता संग्रह आणि भटकंती पुस्तकरुपात करण्याच्या मौलिक सूचना केल्या. त्यातील पहिले 'हिरवी पाती' निसर्गातील सौंदर्यवान स्थळांच्या कवितेच्या रचनेचा संग्रह आज पुर्णत्वाला जातोय.

   कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी हातभार लावणारे,प्रकाशक,मुद्रक आणि अजय प्रिंटिंग प्रेस,

कराडचे श्री नितीन जठार, मुखपृष्ठ डिझायनर श्री नितीन जठार ग्राममित्र प्रकाशन कराडच्या सौ स्नेहल निकम ,मित्रपरिवार आणि माझे कुटुंबीय यांचे ह्रदय पूर्वक आभार.

श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड