Posts

Showing posts from October, 2020

महिला मेळावा आजीचे कवन- १२३

Image
✒️ महिला मेळावा 📚    ( आजीचे कवन ) नात माझी थोर स्त्रियांच्या  कार्याची गोडवी भाषती  व्यासपीठी समद्या आज्या   ध्यान  देवूनी  ऐकती | मुलांनो शाळा लयी शिका  असं सांगती थोर फुले शाहू बाबासाहेबांचे चरित्र वाचून     त्यांच्या पुस्तकप्रेमाचा वसा घेऊ  | नाही कधी मान मिळाला सामाजिक कार्यक्रमात  आज मातर मान दिला  महिला मेळाव्यातल्या खुरचित| काय बया झालं कवतिक   बोलताना पोरं हासली   मजा त्यांना वाटती  आजी आज अतिथी झाली | आमी शाळेत नाय गेलो  पण जगायची शाळा शिकलो  हसायच्या खेळायच्या वयी  सासरच्या परपंच्याला लागलो| सालपाई देवीच्या अंगणात  जमला महिलांचा मेळा  फेर धरूनी गाऊया  झिम्मा फुगडीच्या खेळा | श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे  काव्य पुष्प-१२३

कोजागिरी पौर्णिमा एक आठवण

Image
🍁🌿🍁🌿🍁🌿🍁 कोजागिरी पौर्णिमा साठवणीतल्या आठवणी मित्रांसमवेत कोजागिरी साजरी !! टिपूर चांदण्यात,  दूध आठवत  ,  गप्पा मारत  जागरण करत  मैफिलीला रंगत ... 💫〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️  कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रमोद निंबाळकर भाऊंच्या दुकाना जवळील कट्ट्यावर आम्ही चार-पाचजण गप्पा मारत बसलो होतो.एकानं,'गुरुजी उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे.चांदण्यात दूध आठवायचं नियोजन करायचा का? 'असं अचानक  विचारले. जेवण करायच्या अगोदर का नंतर करायचं यावर खल सुरू झाला. काहीजणांनी आम्ही घरीच नियोजन केले आहे.  त्यामुळे तुमचं तुम्ही ठरवा. सगळी असतील तर आपण भी येऊ,असं एकेकजण तेढत छेडत बोलत होते. त्यापेक्षा उद्या शुक्रवार आहे जाऊया हॉटेलवर जेवायला.. तिथंच कोजागिरी साजरी करु,अशी एकाची सूचना. सगळे मिळून उद्या कोजागिरी कुणाच्यातरी रानात साजरी करुया जेवणानंतर., दुधाचा खर्च मी करतो.'असं मी म्हणत असतानाच आमचे आप्पा डेअरीला दुध घालायला निघाले होते.त्यांना हाक मारली.सगळ्यांच्या देखत बोललो,'आप्पा सायंकाळी डेअरीला दुध न घालता तशीच किटली दुकानात ठेवा.उद्या रानात कोजागिरी साजरी करायची ...

कोजागिरी पौर्णिमा काव्य पुष्प-१२२

Image
🌝💫🌝💫🌝💫                  कोजागिरी पौर्णिमा धानाच्या ओंब्यांची तोरणं बांधूया  कोजागिरी पौर्णिमेला नवान्न पुजूया  मित्र कुटूंबासवे शांत स्थळी जाऊया नभीचं तारांगण मनसोक्त  पाहूया❗ मसाला दूध केशर बदाम चारोळीचे   चंद्राच्या प्रकाशात मंदाग्नीवर आटवूया  कढईतल्या दुधात दिसते प्रतिबिंब चंद्राचे   नयनमनोहरी  दृश्य मनात साठवूया ❗ आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊया  गाणी गप्पागोष्टींची मैफिल सजवूया  रात्रीचं शीतल चांदणं  मनभरुन पाहूया  शुभ्रधवल चांदण्यात न्हावून जावूया ❗ मसाला दूध प्राशन करीत  मजेत पुनव साजरी करुया  शांत शीतल रुपेरी प्रकाशात शरदाचं पिठूर चांदणं पाहूया ❗ मसाला दुधाचा आस्वाद घेऊनी   कोजागिरीला जागरण करूया गुलाबी थंडीची चाहूल जाणूनी  आनंदाच्या दिवाळीची वाट पाहूया ❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प-१२२ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

धरण परिसर काव्य पुष्प १२१

Image
           🍂   धरणपरिसर🍂     (पाणलोट क्षेत्र ) नभी धवल ढगांनी कापूस पिंजारला निळ्या आकाशी  नजारा सजला❗ क्षितीजावर एकी  निळसर ढगांची  गर्द  वनराई  डोंगर रांगांची❗ जलसंपदा ओथंबली  पाणलोट क्षेत्र भरले झाडंवेली काठी सजली  रम्य दृश्य नजरेत साठवले❗ मन मोहरले,मोर झाले आनंदाने नाचू लागले  निसर्गाचं भरभरून देणं आपलीच ओंजळ रिती राहणं❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प१२१ यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

शेतातला फुलोरा काव्य पुष्प १२०

Image
🌱☘️ शेतातला फुलोरा  ☘️🌱 गगनी काळेभोर मेघ दाटले कुंद हवेने वातावरण भरले  वाऱ्याची झुळूक अबोल झाली  तनमनाची लाही लाही झाली ❗ गर्द हिरव्यागार रानोरानी  पाखरांची गुंज येते कानी शिवार बहरलय पिकांनी तुरीच्या पिवळ्या फुलांनी  ❗   फुलोऱ्याच्या फांद्या सरळ त्यावर लगडली नाजुक फुले  पिवळ्या रंगाच्या टिकल्या शोभती फुलदाणीतली शोभिवंत फुले❗ ऊस,केळीची बागायती शेती शेतकरी जपतो निसर्ग नाती  कडधान्य अन् भिमूग फुलती शेतकऱ्यांचे कष्ट रानात दिसती❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई  काव्य पुष्प १२० यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https:// raviprema.blogspot.com

चारापाणी काव्य पुष्प ११९

Image
    चारापाणी चांदणीच्या झाडावरी माझ्या शाळेच्या अंगणी चिमणी पाखरं टिपती  खाऊ चारा अन् पाणी ❗ शाळेत मुलांचा किलबिलाट झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट   दाणं टिपण्या झुंबड उडते  भांड्यावर बसून गप्पा मारते ❗ कोलाहलामुळे मी दरवाज्यातून बघतो चारा टिपणं पाहून आनंदतो  पाय न वाजविता व्हरांड्यात येतो  आम्ही सगळेच त्यांना न्याहाळतो ❗ आमच्या गोंगाटाची चाहूल लागते भुरकन उडून भरारी मारते  मग आमचं ध्यान भानावर येतं आमचं शिकणं पुढं सुरू होतं ❗ काव्य पुष्प ११९ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com प्रतिक्रिया पाखरांची चिवचिव...  मंजुळ असते सदा...  लटींगे सरांची कविता आहे..  लडिवाळ प्रतिभेची अदा. श्री राजेन्द्र वाकडे सर तारळे पाटण 

हिरवाई बाग काव्य पुष्प ११८

Image
        हिरवाई  काबाडकष्ट करून  शिवार फुलवले  घामाच्या धारांचे अत्तर शिंपडले ❗ मातीचा टिळा कपाळी लावला मायेचा ओलावा स्पर्शून गेला झाडांना फुले फळे बहरली शेती गर्द हिरवाईने नटली ❗ जलाने केले सिंचन  कष्टाचे केले शिंपण  शेतकऱ्यांचे हेच वतन त्यांना बनवते सधन ❗ पपया पेरुत साखर पेरणी  (फळांच्या होतील मग ऐरणी )   घोसदार फळे दिसती रानी  खिशात खुळखुळतील नाणी  बागायतदार होईल समाधानी❗ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प११८ फोटो साभार श्री गणेश तांबे सर  यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com @@प्रतिक्रिया... शेतकरी जगाचा पोशिंदा शेतात सतत राबत असतो.घाम गाळून पीक काढतो आणि सर्वांना पुरवतो .कवी रवींद्र लटींगे यांनी शेतकरी जीवन या काव्यात मांडले आहे खूप सुंदर कविता धन्यवाद! श्री रमेश जावीर सर  काठ्ष्य शिल्पकार खरसुंडी  आदरणीय सर  मनापासून आभार  आपल्या रानातील विविध फळबागांचा फोटो जतन करून त्यावर केलेली कविता मनापासून आवडली  ही सर्व शेतकरी वर्गां...

विजयादशमी दसरा काव्य पुष्प ११७

Image
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा.... विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ❗ 🌻🌸🌻🌸🌻🌸🌻🌸                 दसरा  दसरा दिवाळीला झेंडूचा मान  शौर्याचे प्रतिक आपट्याचे पान   प्रसन्न ऊर्जेची अमाप खाण  शक्ती भक्तीचा घेऊया वाण❗  विजयीआनंद उत्सव साकारुया विजयादशमी साजरी करुया  गावपांढरीला रामराम घालूया  स्नेहाची नातीगोती जपूया   ❗ ग्रामदेवतांची निघे पालखी सोहळा   वाद्यांच्या गजरात गाव प्रदक्षिणेला  गावकरी आलिंगनती  एकमेकाला  आपटा सुवर्ण पाने अर्पती  देवाला❗ झेंडूच्या फुलांचे तोरण  सजले दारोदारी  वाहने,शस्त्रे,हत्यारे  सयंत्रे पूजन घरोघरी ❗ 💫💫💫💫💫💫💫 श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई काव्य पुष्प ११७

व्याख्यानमाला व्याख्याते हायलाईटस्

ऑनलाईन विचारप्रबोधन माला पंचायत समिती महाबळेश्वर व छंदिष्ट समुह.           हायलाईटस्  🌿🌴🌿🌴🌳☘️🌱 आदरणीय श्रीमान चंद्रकांत पवार सरांनी  व्याख्यानमालेचे पुष्प पहिले गुंफले सुंदर जगण्यासाठी काय करावे बरे  याचे मनमोकळ्या गप्पात हितगुज साधले | कर्णमधूर शब्दांनी विषय भावला  पुस्तक प्रकाशनाचा आवाका समजला  नव शब्दप्रभुंचे प्रेरणास्रोत गुरुजी आहे  सेवानिवृत्ती नंतरही लेखनात सजगता आहे| ____________📚✒️🗞️📚📖✒️🗞️ व्याख्यानमालेचे दुसरे ज्ञानपुष्प गुंफले श्रीमान मनोहर भोसले मनुदांनी  लेखन प्रवासाचा उलगडा केला  रसाळ ओघवत्या शैलीत पत्रकार मित्रानी| संवेदनशील पाठाचे लेखकमित्र भेटले आनंदाला पारावार नाही उरले व्यवहारीक जीवनानुभव इत्यंभूत टिपले  त्याचेच चित्रण शब्दात उतरविले|      ################       🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सजले  श्री महादेव लांडगे सरांच्या सेवा कर्तृत्वाचे  कोणताही अभिनिवेश न बाळगता  संवेदनशील मनाच्या मनोयात्रेचे | आयुष्यातील टर्निंग प...

नवरात्र उत्सव ११६

Image
* दुर्गात्सव  * नवरात्र उत्सव  काबाडकष्टाने उच्चशिक्षित झाली  ध्येयासाठी परिस्थितीशी झगडली  जिद्दीच्या बळावर यशस्वी झाली  संघर्षाची सुखात परिणिती झाली  हीच खरी नवदुर्गा  ....... कोवीड काळीआत्मभान ठायी  सेवाभावी वृत्तीने कार्यरत राही  परिचारिका सेवाव्रती ताई    अन् समस्त डॉक्टर माई ह्याच खऱ्या नवदुर्गा ........ रस्ते चौक बाजार दवाखाने   या ठिकाणी ड्युटी बजावली कसं वागावं याची जनतेला  पोलिसताईंनी सवय लावली  त्या खऱ्या नवदुर्गा .... नगर शहरांचे आरोग्य रक्षती  रस्ते बागांची स्वच्छता करती    स्वच्छतेचे दूत खरे कर्मचारी स्वच्छतेचा मूलमंत्र जोपासती  त्याच खऱ्याखुऱ्या दुर्गा...... कोवीड लाॅकडाऊनच्या काळात  पर्वा न करता वाऱ्या पावसाची   शेतात राबणाऱ्या मातांची  धान पिकविणाऱ्या माऊलींची त्या खऱ्याखुऱ्या दुर्गा  ..... लाॅकडाऊन असो वा नसो  घरात राबणाऱ्या माता भगिनी  कुटूंबाच्या मदतीला न थकता  सतत धावणाऱ्या घर कारभारनी  याच खऱ्याखुऱ्या दुर्गा... श्री रविंद्र लटि...

जागरण गोंधळ काव्य पुष्प ११५

Image
🍁🌾☘️🍂🌾🌻 नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ 🕯️  जागरण गोंधळ 🕯️ कलावंत महिमा गाती  जागरण गोंधळ घालती  भजन कीर्तन आख्यान असे अनेक रुपक सादर करती 🕯️ टिपऱ्या दांडिया नाच रंगती  भक्तीभावे गाती आरती  होम हवन मंत्राजली अर्पती  उदकशांतता प्रसन्न करती 🕯️ प्रकाशाचे दिवे तेवती राउळी नवरात्री लख्ख तेजोभान दीपमाळी  विद्युत रोषणाईचा झगमगाट देऊळी  मंत्रजागराचा  घोष सदाकाळी 🕯️ रेखाटती रांगोळ्याअंगण दारी  फुलांची तोरणं लटकती दारोदारी आनंदाला उधाण येते घरीदारी  उपासनेने सुख नांदू दे घरोघरी 🕯️ काव्य पुष्प ११५ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

नवरात्र उत्सव काव्य पुष्प ११४

Image
🌾नवरात्र उत्सव दुर्गात्सव 🌱 नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ दैत्यनिवारिनी ....... तुळजापूरची भवानीआई करविर निवासिनी अंबाबाई सप्तश्रृंगीगडावरची सप्तश्रृंगी देवी माहूरगडची रेणूकादेवी || भावभक्तीची ........ माहेर पंढरीची रखूमाई  गुंफा निवासिनी वैष्णोदेवी  हंसवाहिनी सरस्वती  कैलाश निवासिनी देवी पार्वती || सर्वांस्त्रधारिणी........  कमलवसनी देवीलक्ष्मी   मुंबापूरीची महालक्ष्मी   पेठपारची श्रीराम वरदायिनी  औंधनिवासिनी देवी यमाई || मंगलमांगल्याची.......... मांढरगडची मांढरदेवी काळूबाई  वाई व कराड नगरीची कृष्णाबाई  असले निवासिनी भवानी आई   खावलीची नवलाई खावलाई || ग्रामनिवासिनी........... ओझर्डेची श्री पद्मावती देवी  भुईंज निवासिनी महालक्ष्मी देवी  कोंढावळेची सालपाई   मेणवलीची वाघेश्वरी देवी|| काव्य पुष्प ११४

दुर्गात्सव काव्य पुष्प ११३

Image
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ देवीच्या चरणी शतशः नमो नमः दुर्गात्सव  उत्सव नवदुर्गेचा  जागर स्त्रीशक्तीचा  गौरव यशोगाथेचा  मान आत्मसन्मानाचा❗ एकेक माळ बांधूया  शक्तीची पूजा करुया एकेक दीप प्रज्वलूया  चेतनेचा आनंद उजाळूया❗ एकेक कवन गाऊया देवीचा जागर घालूया  एकेक रुपाची पूजा बांधूया  मनोभावे देवीची उपासना करुया ❗ वाजती संबळ साथ तुनतुन्याची  गोंधळ सजे बाय चाल गाण्याची वाद्यांचा गजर आला कानी  एकमुखाने करुया जयघोष वाणी ❗ काव्य पुष्प ११३ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com

सालपाई माता कोंढावळे काव्य पुष्प ११२

Image
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗कोंढावळे निवासिनी श्री सालपाई देवी चरणी शतशः नमो नमः आईच्या चरणी साष्टांग दंडवत.... 🚩सालपाई माता 🚩      उत्सव नवरात्रीचा जागर स्त्रीशक्तीचा मातृशक्तीच्या उत्सवाचा  घट स्थापना करण्याचा 🌾 विचारांची पुष्पमाला बांधली सजावट पर्णमालेची सजली चैतन्याचा तेवता नंदादीप दिसे तेजोमय मातेचे रुप 🌾 भक्तिभावाने जन लोटती  देवीपुढे नतमस्तक होती  मातेची थोरवी फार अपार   चैतन्य ऊर्जेचा करी पाझर 🌾 महिमा भावभक्तीचा  तेजस्वी नवप्रकाशाचा नंदादीपाच्या तेवण्याचा  व्रतवैकल्ये करण्याचा 🌾 पिवळ्या फुलांची माळ बांधूया  कडाकणी देवीस अर्पण करुया  देवीची नवरुपात पूजा बांधूया लोककलांचा जागर घालूया 🌾 कोंढावळे ग्रामी स्वयंभू देवी सालपाई  समस्त भाविक जनांची श्रीवरदायिनी  नवरात्रीत समयांच्या प्रकाशती ज्योती  भक्तीभावाने देवीच्या दर्शना जन येती 🌾 काव्य पुष्प ११२ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी. https://raviprema.blogspot.com फोटो साभार -श्री अंकुश ...

श्रीराम वरदायिनी पेठपार काव्य पुष्प १११

Image
नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ पेठपार निवासिनी श्रीराम वरदायिनी माता ....चरणी शतशः नम:      काव्य पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा  पावन परिसर गौरवशाली शौर्याचा  घनदाट अरण्यी मातेचे राऊळ दिव्यांनी उजळे नवरात्रीत देऊळ || पवित्रमांगल्याचा घट श्रद्धा भावभक्तीचा पट  संस्काराचे ज्ञानपीठ  आदिमायेचे शक्तीपीठ || विचारांची पुष्पमाला बांधली सजावट पर्णमालेची सजली चैतन्याचा तेवता नंदादीप दिसे तेजोमय मातेचे रुप || भक्तिभावाने जन लोटती  देवीपुढे नतमस्तक होती  मातेची थोरवी फार अपार   चैतन्य ऊर्जेचा करी पाझर || प्रभुरामाची वरदायिनी  माता श्रीराम वरदायिनी पेठपारला जाऊ दर्शनाला  रुप ह्रदयात साठवयाला || काव्य पुष्प १११ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई फोटो साभार श्री अमित कारंडे सर

मांढरदेवाचे देवीचे कवन काव्य पुष्प ११०

Image
मांढरगड निवासिनी श्री काळूबाई काळेश्वरी मांढरदेवी आईसाहेब माता....चरणी शतशः नमन काळेश्वरी आईसाहेब माता मांढरगड निवासिनी श्री काळूबाई काळेश्वरी मांढरदेवी आईसाहेब माता..चरणी शतशः नमन काळेश्वरी आईसाहेब माता नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗ श्रध्देच्या भक्तीने  करुया प्रवास  मांढरगड डोंगरी  मातेचा निवास | दाट झाडीत आईचं देऊळ पायऱ्यांच्या वाटेने दर्शनाला जाऊ चैतन्याचे तेजोमय रुप पाहुनी  मनोभावे देवीला वंदन करु | नवरुपात पुजूनी उपासना करुया संबळाच्या गजरात आरती गाऊया  कृपाप्रसादाचा आशिर्वाद दायिनी मंगल मांगल्याचे छत्र धारीनी |  दैत्यांच्या पाडावाला   देवीने घेतला अवतार  थोर अगाध महिमेचा   ऐकूया या कथासार | काव्य पुष्प ११० फोटो साभार फेसबुक

माझी शैक्षणिक भटकंती चिंचणी ऐने डहाणू भाग क्रमांक-१२८

Image
🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂 माझी शैक्षणिक भटकंती भाग क्रमांक--१२८ 🌱डहाणू ऐने ✒️📚               🦋🍁🦋🍁🦋🍁🦋🍁     चिंचणी समुद्रकिनारा व प्रवास  ➖➖➖➖➖➖➖           उत्तरार्ध             असेच एकदा चारच्या दरम्यान सेशन संपल्यावर उत्साही शिक्षकमित्र-मैत्रिणी चिंचणीच्या समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. समुद्रकिनारे म्हणजे निसर्गाची बहुमूल्य देणगीच. रमणीय ठिकाणे.मौजमजा करायला आवडीचं ठिकाणं.नजर जाईपर्यंत दिसणारे अथांग पाणी,भुरळ घालणारे गर्दझाडीचे समुद्रकिनारे आणि त्यात लपलेली हाॅटेल्स.रेशमासारखी मऊशार रुपेरी वाळू,शंखशिंपले हातात घेऊन खेळायला मजा येते.कित्येक वेळ आपण त्यांच्याबरोबर रममाण होतो.वाळूत बोटांनी रेघोट्या मारतो.किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा फुटत फुटत वीरत जाताना पहातच राहायला आवडते.आम्ही बऱ्याच जणांनी थोड्या अंतरावर पुढं जावून लाटां पायावर घेतल्या.काही मनसोक्त डुंबले. काहीवेळाने आम्हाला आकाशात स्वैरपणे थव्याने  संचार करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे विविध आकार बघायला मिळाले.  त्...

काव्य पुष्प घटस्थापना १०९

Image
ओझर्डे ग्रामनिवासिनी ग्रामदैवत श्री पदमावती देवी .. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❗       (घटस्थापना) मातृशक्तीची पूजा करुया  चेतना उर्जा मिळवूया  व्रत उपवासाचे धरुया  घराला सुखशांती मिळवूया | मातृशक्ती भक्तीचा उत्सव आला  चला देवघरात घट स्थापूया  कुलदेवतेचे  आर्जव पूजनाला  घटाच्या वावरीत धान पेरुया | पिवळ्या रंगाच्या पुष्पमाला  घटाला मनोभावे अर्पण करुया सुखसमृद्धीचा सण हा आला मनोभावे उपासना चला करुया | चैतन्याचा नंदादीप तेवत ठेवूया तमसाची काजळी झटकूया  दुर्गादेवीचे नामस्मरण करुया  लोककलांचा जागर घालूया| काव्य पुष्प १०९ श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 

माझी शैक्षणिक भटकंती मुक्तशाळा ऐने भाग क्रमांक--१२७

Image
🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂  माझी शैक्षणिक भटकंती भाग क्रमांक--१२७ 🌱डहाणू ऐने ✒️📚               🦋🍁🦋🍁🦋🍁🦋🍁       ग्राममंगल मुक्तशाळा व  परिसर  ➖➖➖➖➖➖➖ सकाळी दहा वाजता आमच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली.संस्थेचे प्रशिक्षण स्थळ  ओपन सभागृहात होते.पहिलेच सेशन आदरणीय प्रा.रमेश पानसे सरांचे होते.त्यांनी एक सूचना मला फार भावली.तुम्ही वर्गात कसेही बसा, आनंदानं सहभागी व्हा, कंटाळा आला तर परिसर फिरून या आणि मनापासून लक्ष द्या..... सर्व विषयांत माहिर असणारे मान्यवर आम्हाला  मार्गदर्शन करायला होते.प्रा.रमेश पानसे सर,  श्री मोने सर,नातू मॅडम,प्राची मॅडम इत्यादी.ग्राममंगल संस्थेचे  स्नेहघर आणि लावण्य असे प्रकल्प आहेत.शैक्षणिक उपक्रमांची प्रयोगशील शाळा इथं आहे.मुलं अनुभवातून शिकतात.शिक्षक मदत करतात.मुलांना गटागटात  अभ्यास दिला जातो.प्रत्येक गोष्ट,गृहीतक आणि घटक व्यवहाराच्या कसोटीवर पारखण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावली जाते.इथल्या  शाळेचे नाव आहे "मुक्त शाळा " नैसर्गिक शिक्षण.  मुलांनी गटात किंवा...

माझी भटकंती ऐने डहाणू भाग क्रमांक-१२६

Image
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂 माझी शैक्षणिक भटकंती भाग क्रमांक-- १२६     🦋मे २०१३ 📚 ऐने डहाणू ✒️ ➖➖➖➖➖➖➖➖        प्रवास पूर्वरंग  ग्राममंगल ज्ञानरचनावादी शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांचे शिकणं स्वयंम कसं घडतं .हा नवीन प्रयोग पहाण्यासाठी गेलो होतो. ८मे ते १४ मे २०१३ या कालावधीत तिथं इयत्ता-पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना रचना वाद पध्दतीने अध्ययन अनुभव कसे द्यायचे याचं प्रशिक्षण आयोजित केले होते.मी आणि माझ्या एक सहकारी वाईतुन या प्रशिक्षणासाठी गेलो होतो.विविध जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.वाई ते कात्रज जनतेचा रथ लालपरी असा प्रवास तर कात्रज ते ठाणे असा खाजगी अॅम्बेसिडर मधून प्रवास केला होता.वाशी येथे हायवेच्याच एका हॉटेलजवळील बागेत घरुन घेतलेली शिदोरी सोडून आम्ही चौघांनी जेवण घेतले.तदनंतर ठाण्याला निघालो.ठाणे ते ऐने अशा प्रवासाचा लाभ  आम्हाला प्रत्यक्ष रचनावादाचे प्रणेते आदरणीय प्रा.रमेश पानसे सर यांच्या सहवासात त्यांच्या कार मधून झाला होता. ओळख परिचय गप्पागोष्टी करत आम्ही प्रयोगशील ऐने कडे ऐन उन्हाळ्यात मार्गस्थ झालो... शहरातील रस्त्यांवर दुतर्फा वा...

माझी भटकंती श्री नाईकबा भाग क्रमांक-१२५

Image
🍂☘️🍂☘️🍂☘️🍂 माझी भटकंती भाग क्रमांक--१२५   🛕श्री नाईकबा बनपुरी 🛕 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला सातारा जिल्ह्यातील. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कडेकपारीत वसलेला पाटण तालुका.डोंगराच्या माथ्याव, मध्याव आणि  पायथ्याशी गर्द हिरव्यागार जंगलझाडीत विखुरलेली गावे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना आणि तिच्या उपनद्यांच्या दुतर्फा काठांवर वसलेली गांव.कोयना धरण परिसर ,  अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,  नवज  पावसाचे आगर ,ओझर्डे धबधबा, रिव्हर्स धबधबा अशी अनेकाविध प्रेक्षणिक पर्यटनस्थळे  पाटण तालुक्यात आहेत.त्यापैकीच वाल्मिक पठार, दिवशी घाट,वांगमराठवाडी व महिंद धरणं, भोसगांव फुलपाखरु निसर्ग पर्यटन केंद्र आणि ढेेेवाडी वन विभागातील  ओहळ ओढे, धबधबे,  पशुपक्षी, वृक्षसंपदा आणि पठारावरील रानफुलांचा रंगिबेरंगी फुलोत्सव अशा सौंदर्य स्थळांनी समृद्ध असलेला ढेबेवाडी परिसर...याच भागात महाराष्ट्र व कर्नाटकातील समस्त जनांचे लाखो कुटूंबियांचे श्रध्दास्थान  शक्ती भक्तीचे कुलदैवत असणारे श्री नाईकबा देवस्थान वांग नदीच्या परिसरात डों...

माझी भटकंती श्री ज्योतिबा वाडी भाग क्रमांक १२४

Image
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂 साठवणीतल्या आठवणी       माझी भटकंती  कौटुंबिक सहल  🍁🌻 ज्योतीबा 🌻☘️ भाग क्रमांक-- १२४ दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ➖➖➖➖➖➖➖ सायंकाळ होत आली होती.. वातावरणात गारवा जाणवत होता.घाटाने निघालो होतो.सूर्यास्ताचे दृश्य नजरेस पडत होते. तांबूस सोनेरी छटेत पश्चिमेकडील आकाश नटलेले  दिसत होते. थोड्याच वेळात आम्ही ज्योतिबा पठारावर आलो.गाडी पार्क करून देवदर्शनाला चालत निघालो. पन्हाळ्यापासून कृष्णेकडे असलेल्या डोंगराच्या एका फाट्यावर ज्योतिबा डोंगर आहे.याच डोंगराच्या शंखाकृती व हत्तीच्या सोंडे सारख्या पसरलेल्या पठारावरील वाडी रत्नागिरी या गावात दख्खनचा राजा ज्योतिबा लाखो कुटुंबियांचे कुलदैवत आहे.ज्योतिबा दैवत  म्हणजे  साक्षात शिव आणि सूर्याचे रुप मानण्यात येते. मराठा शैलीतील भव्य प्रवेशद्वार असून मंदिराकडे बांधिव पायऱ्यांचा मार्ग आहे."चांगभल रं, चांगभलं रं,देवा ज्योतिबा चांगभलं रं " अशी श्रवणीय गाणी मंदिराकडे जाताना ऐकायला मिळतात..पायऱ्या उतरताच देवळांचा समुह समोर दिसतो.मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे.सगळा परिसर  गुलालाने माखलेला दिसतो....

माझी भटकंती पन्हाळगड भाग क्रमांक--१२३

Image
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂 साठवणीतल्या आठवणी       माझी भटकंती  कौटुंबिक सहल  🍁🌻पन्हाळगड, 🌻☘️ भाग क्रमांक-- १२३ दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ➖➖➖➖➖➖➖ उत्तरार्ध  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या वास्तव्याने पावन झालेला ,दक्षिणेकडील प्रवेशद्वार असणारा पन्हाळगड....      पन्हाळगड समुद्र सपाटी पासून सुमारे ४००० फुट उंचीवर असून हा गिरीदुर्ग प्रकारातील ट्रेकिंग साठी सुलभ किल्ला आहे.सध्या हे पर्यटनस्थळ असून इथं नगरपरिषद आहे.अनेक दुर्गप्रेमी आणि पर्यटक कोल्हापुरात आल्यावर पन्हाळगड पहायला आवर्जून येतात. किल्ल्याचे बांधकाम विजापूर शैलीचे असून गडावर अनेक माच्या व भुयारी मार्ग आहेत . गडाची तटबंदी ७किमी आहे.       गडावरील अनेक स्थळे बघताना त्यातून इतिहासाच्या पाऊलखुणा आणि जाज्वल्य कार्यपटल व प्रसंग  नजरे समोर उभा राहतो.गडावर राजवाडा,सज्जा कोठी,राजदिंडी,अंबारखाना,चार दरवाजा,सोमाळे तलाव, रामचंद्र अमात्य यांची समाधी,रेडे महाल,अंधार बावडी, तीन दरवाजा,कलावंती महाल  आणि सोमेश्वर, अंबाबाई आणि महाक...

माझी भटकंती पन्हाळगड भाग क्रमांक--१२२

Image
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂 साठवणीतल्या आठवणी       माझी भटकंती  कौटुंबिक सहल  🍁पन्हाळगड  🌻☘️ भाग क्रमांक-- १२२ दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ➖➖➖➖➖➖➖         पूर्वरंग कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मातेचे देवदर्शन करून आमची गाडी २० किलोमीटरवर असलेल्या किल्ले पन्हाळगडाकडे निघाली होती. शहरापासून आम्ही रत्नागिरी रस्त्याने निघालो होतो.दुतर्फा उसाची बागायती शेती नजरेत भरत होती. कोल्हापूर म्हणजे गुळ आणि साखरेची नामांकित बाजारपेठ..   छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारातून साकार झालेलं राधानगरी धरण ,पंचगंगेचा परिसर  आणि ओढे नाले व छोट्या नद्यांवरील  के.टी.वेअर बंधाऱ्यामुळे  सुजलाम सुफलाम शेती सर्वत्र  दिसत होती. कोल्हापूरची खासियत असणाऱ्या सामिष जेवणाची हॉटेल्स जागोजागी नजरेत भरत होती...पण आज घरुन बांधून आणलेल्या जेवणावरच ताव मारावा लागणार होता.त्यामुळे केवळ फ्लेक्सवरच्या मेनू पाहून मन भरण्याचा प्रयत्न सुरू होता. कोल्हापुर शहरापासून बाहेर पडल्यावर  अर्ध्या एक तासाने एका बऱ्यापैकी सावलीच्या झाडाजवळ विजूभावने गाडी...

माझी भटकंती कोल्हापूर भाग क्रमांक-१२१

Image
🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️ साठवणीतल्या आठवणी माझी भटकंती कौटुंबिक सहल  भाग क्रमांक--१२१ दिनांक १३नोव्हेंबर २०१८ 🔆कोल्हापूर महालक्ष्मी🔆 ➖➖➖➖➖➖➖ माझे बालपणीचे सवंगडी श्री विजय तांगडे (भावड्या) याच्या मुलानं चारचाकी वाहन घेतले होते.त्यातून फिरायला जायचं दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई,ज्योतिबा आणि पन्हाळगड असे नियोजन केले होते.. कुटूंबाची ट्रीप असल्यामुळे घरुनच जेवणाचा सरजाम केला होता. सकाळी ९ वाजता आम्ही मार्गस्थ झालो होतो..वाई -ओझर्डे-सातारा-कराड करत करत आम्ही पुढे निघालो होतो.टोप येथील गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी निघालो होतो.साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले जागृत मातृपूजेचे आद्य व शक्ती उपासक देवस्थान म्हणून लौकिक असलेले जागृत आहे. भक्ती केल्याने मुक्ती मिळते या उक्तीप्रमाणे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.देवस्थानच्या पार्किंग मध्ये गाडी लावून चालत चालत आम्ही मंदिराकडे निघालो.विविध प्रकारची दुकाने थाटलेली होती.कोल्हापूरची खासियत असणारी कोल्हापुरी चपलांची दुकाने नजर ...

माझी भटकंती गोळेवाडी भाग क्रमांक १२०

Image
🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁 🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁  माझी भटकंती       भाग क्रमांक --१२०   ☘️गोळेवाडी परिसर          उत्तरार्ध    ➖➖➖➖➖➖➖     धरण परिसराचा नजारा बघितल्यानंतर आम्ही गोळेवाडीकडे मार्गस्थ झालो.निसर्गाच्या कुशीतलं गोळेवाडी छोटंसं टुमदार गावं.निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला परिसर. कड्याच्या सपाट भागावर जागोजागी विरळ घरांची वस्ती दिसत होती.भात,नाचणी आणि वरी निसवत चालली होती.       काहीजण विशेषतः स्त्रिया शेतात काम करताना दिसत होत्या. ओढ्याच पाणी खळाळत धरणात जात होतं.ज्या भाताच्या खाचरात  पाण्याची गरज आहे.त्यासाठी  वढ्याच्या वाहत्या पाण्यात पीव्हीसी पाईपा टाकून शेतात वळवलेले एकेठिकाणी दिसले . सायपन तंत्राचा वापर शेतकरी करताना दिसून आला.इकडं बऱ्याच गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सायपन तंत्राचा वापर करून केलेल्या आहेत. डोंगरातील जिवंत झरे पाहून तेथील पाणी लोखंडी पाईपाने  आणणे.साठवण टाकीत साठविणे आणि नळाद्वारे घरापर्यंत पोहचविणे..             एवढ्यात आ...