काव्य पुष्प- २४३ धबधबा
धबधबे
कड्यातून धबधबे वाहती
दुधाळ जलधारा कोसळती
दुग्धाभिषेक कातळाला करती
तेव्हा दुधाळ फवारे उडती||
जलधारा उसळती कड्यावरी
साखरनळ्या नजरेत भरी
सृष्टी नटली रुपात भरजरी
जलप्रपाताचे कोंदण भारी ||
कोसळती उंच कड्यातून
सफेद दुधाळ जलधारा|
धबधबे घालती लोटांगण
अन् तुषार उसळवी वारा|
उसळत्या जलधारा कड्याखाली
शुभ्र फवारे वाऱ्या संग उंडारी
गतीने उतरती पायथ्याखाली
जलप्रपाताचे सौंदर्य दिसे भारी ||
पानापानातून थेंब झरती
वसुंधरेला चिंब भिजविती
डोंगरमाथी प्रवाह ओघळती
कड्यातून खाली कोसळती||
सर ,खूपच सुंदर रचना!
ReplyDeleteअप्रतिम सर
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteNice
ReplyDelete