निसर्ग सौंदर्य शेंबडी सूर्यास्त ७
चैतन्य देवून अस्ताला जातोय
नव्या स्वप्नांना घेऊन येतोय|
सोनेरी किरणे चोहीकडे
वाऱ्याची झुळूक सगळीकडे||
आसमंतातील तांबूस छटा
बिंबीत झाली जलावरी|
भंडारा उधळला आकाशी
नजारा दिसतोय भारी||
या दृश्याने तणावाचे काहूर पुसले
आनंदाचे गाणे उमजले|
हवा जल अन् प्रकाश
हेच जीवनाचे आकाश ||
आनंदाचे गाणे उमजले|
हवा जल अन् प्रकाश
हेच जीवनाचे आकाश ||
झाडोऱ्याची शिल्प नक्षी
पाण्याव शोभतेय पक्षी
सुखद गारवा रम्य सांजेचा
आनंदाने नाचेल मोर मनीचा ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया
फोटोतील नजारा आणि कवितेतील शब्दफुलोरा
सगळंच लय भारी,लटिंगे सर!🌹👌
श्री महादेव भोकरे सर खटाव
Nice sunset
ReplyDeleteSunset
ReplyDelete