माझी भटकंती माथेरान भाग क्र-७४
🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀
माझी भटकंती
क्रमशः भाग-७४
प्रवास दिनांक २० जानेवारी २०१६
माथेरान🔆🍀🔆🌳🍀🔆🍀🌳🍀🌳
माथेरान मुंबई जवळील नामांकित हिलस्टेशन आणि तेथील फुलराणी ट्रेनने प्रवास करत माथेरानला जाणं म्हणजे मस्तच पर्वणी असते.
डोंगररांगाचे नैसर्गिक नजराणे बघत बघत फोटोग्राफी करत मजेत भटकंती करायची.
नेरुळला नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलो होतो.लग्न वेळ दुपारची होती.लग्नानंतर वाईला यावे का मुंबईला जावे याची सौभाग्यवतीशी चर्चा करत होतो. जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊया असं माझं होतं.. ओळखीच्या नातेवाईकांशी जवळच्या ठिकाणांची चर्चा करता करता माथेरानचा विषय निघाला... कसं जायचं याची माहिती घेतली.
लग्नाच्या कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोघे रिक्षा करून नेरुळ रेल्वे स्टेशनला आलो.. तेथून पनवेल पर्यंत रेल्वेने आलो.तिथं एका प्रवाश्याला पनवेल बसस्टेशनचा पत्ता विचारला.'ऐसे सिधे जाव, पाच मिनिटके बाद लेफ्टसाईडपे है.' असं त्यांने सांगितलं.ओके सर,मी म्हणालो .
चालत चालत पनवेल बसस्टेशन वर आलो.स्टॅंडवरील गाड्यांच्या पाट्या मूकपणे वाचत ,बघत कर्जत फलाट कोठे दिसतोय ते शोधत होतो...फलाटाशेजारी एक गाडी उभी होती. कंट्रोल रुममधील कंट्रोलर कर्जत गाडी क्रमांक ..... लागलेली आहे.गाडी दोनच मिनिटात सुटेल.ते ऐकले व गाडीच्या नंबरची खात्री केली. पाटी वाचली आणि दोनसिटच्या बाकड्यावर बसलो..पाच मिनिटे होत आली तरी गाडी सुरू होईना... थोड्यावेळाने कंडक्टर आला.डबलबेल दिली...चला तिकिट तिकिट,,सुट्टे पैसे काढा असं म्हणत होता.. तेवढ्यात ड्रायव्हरने गाडी सुरू केली... कंडक्टर जवळ येताच दोन कर्जत द्या,मी म्हणालो.'कर्जत रेल्वेस्टेशन ही बस जाते का दुसरी करावी लागेल' त्याने न बोलता मानेने होकार दिला..पाऊणएक तासाने रेल्वे स्टेशन स्टॉपवर सगळी गाडी रिकामी झाली.चालत चालत स्टेशनवर पोहोचलो अन् ट्रेन आली .पण तिकिट नसल्याने त्याच्यात जाता आले नाही.. मग चौकशी करून तिकिट खिडकीकडे गेलो.दोन नेरळची तिकिटे काढली.ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर ट्रेनमध्ये बसलो.फारशी गर्दी नव्हती . बसायला जागा मिळाली.नेरळ स्टेशन आले की खाली उतरलो.. साडेसहाला मिनी ट्रेन माथेरानला जाणारी असते.ती मिळण्यासाठी गडबड करत होतो.
एका प्रवाशाला तिकीट विंडो कुठे आहे विचारले,त्याने आगे देखो ,असं सांगितलं..तसेच पुढील तिकिट विंडोजवळ जाऊन दोन तिकिटे काढली व त्याच्याकडे ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागते हे विचारले, उजवीकडे पटकन जावा. ट्रेन उभीच आहे.तिकिट खिडकीच्या पलीकडील रुळावर फुलराणी मिनी ट्रेन उभी होती... पटकन जाऊन बसलो.ट्रेनच्या डब्यात जास्त गर्दी नव्हती.भोंगा वाजला ट्रेन सुरु झाली.आम्ही सांजवेळी माथेरानला निघालो.'ट्रेन मिळाली नसती तर वडापने अमन होटल पर्यत जाऊन.तेथून पुढे चालत चालत माथेरानला जावं लागलं असतं.'हे सौभाग्यवतीला सांगितलं.''
'तुम्ही गडबड केल्याचा आणि वेळेत बस मिळाल्याचा फायदा झाला'तिचे मला सांगणं. मस्तपैकी निसर्गाची विविध रूपे न्याहाळत शांतपणे आमचा प्रवास चालला होता.. डब्यात वीसतीस जण असतील.चारपाच नवी जोडपी,काही विद्यार्थी ,आम्ही दोघं आणि आमच्याच वयाची एकजोडी होती.
समवयस्क गृहस्थाने चौकशी करायला सुरुवात केली.कोण कुठले फिरायला आलाय का,?किती दिवस मुक्काम?. प्रश्र्नांची सरबत्ती सुरू झाली..मीही त्याला एक दिवस रहायला आणि फिरायला निघालोय.असं सांगितले.तो लगेच हॉटेलचे व लॉजचे कार्ड हातावर ठेवत म्हणाला, आमचं घरगुती लॉजिंग आहे..कार्ड बघितलं दर विचारला...नंतर सांगतो म्हणालो....खिडकीतून डोंगर झाडी बघत,बायकोशी गप्पा मारत होतो...नंतर लॉजिंगचे फायनल करुन त्याला सांगितले..तो म्हणाला,'स्टेशनवर उतरल्यावर गाईडने लॉजिंग विषयी विचारले तर बुकिंग केलेय म्हणून सांगा.. पुढे थोड्या अंतरावर मी तुमची वाट बघतो. मग आपण जाऊ'मी चालेल,'म्हणालो.'
रात्री आठच्या दरम्यान आम्ही माथेरान स्टेशनवर पोहोचलो.
पर्यटनकर एन्ट्रीपास घेऊन बाहेर पडताच गाईडच्या विळख्यात अडकलो... ते आपापल्या हाॅटेलिंगचे मार्केटिंग करत होते.. दोन-तीन वेळा बुकिंग आहे सांगितल्यावर बाजूला झाले.चालत चालत पुढे गेलो तर ते सद्गृहस्थ वाट बघत थांबले होते....घराजवळच त्यांचे लाॅजिंग होते.कंफरटेबल रुम होती.. मस्तपैकी जेवण आटोपून विश्रांती घेतली...
क्रमशः भाग-७४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment