निसर्ग सौंदर्य रानमेवा करवंद पांडवगड पायथा ४
(बडबडगीत)
जाळीतल्या वेलात काटं बोचती
निरखून पाहूनी चिमटीनं तोडती
पांढरी चिक हाताला चिकटती
दोन्ही चिमटीनं तोडून पाटी भरती
डोंगरची काळी मैना,
गोडी हिची अवीट!
जाळीतली काळी फळं
द्रोणात विका नीट !
जाळीतली काळी फळं
द्रोणात विका नीट !
उन्हाळ्याच्या हंगामी व्यवसायाचे
डोंगराच्या लोकांचे फळ कमाईचे
त्यास लॉकडाऊनने केला घात!
करवांद घ्या आरोळीला आला नाट!!
करवांद घ्या आरोळीला आला नाट!!
लाल मगज गोड लागतो
रसनेची चव वाढवितो
चावताना बिया थुंकतो
तांबड्या रंगात जीभ रंगवितो!!
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment