माझी भटकंती उटी ते म्हैसूर भाग क्र-६२

दक्षिण भारत सहल-सहावा दिवस उटी ते म्हैसूर



🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿🍂🌿

माझी भटकंती
                क्रमशः ६२
             दक्षिण भारत 
सन---२००१
             सहावा दिवस
♾️🌱♾️🌱♾️🌱♾️🌱♾️🌱♾️    
  उटी ते म्हैसूर प्रवास  

अभयारण्यातील 🎋गर्द झाडीतून प्रवास सुरू होता..दुपारचा नाष्टा गाडीतच सुरू झाला.उकाडक्या शेंगा, लाडू चिवडा  खात , हसत खिदळत चेष्टा मस्करी करत प्रवास सुरू होता.बांदीपूर राष्ट्रीय अभयारण्य ते वाघांसाठी राखीव घनदाट जंगल आहे.तिथं भटकंतीला जंगलसफारीची सोय आहे.जंगलातील वळणावळणाचे रस्ते, नजरेच्या टापूतील कोणतंही दृश्य विहंगम दिसत होते.अप्रतिम निसर्ग सौंदर्य..
निसर्ग संपदेची मुक्त हस्ते उधळण केलेली याभागात दिसून येते.... अवर्णनीय निसर्गाची  लोकेशन्स.. पाहून मनीचा आनंद गगनात मावेनासा होतो...मग त्या दृश्याला उस्फुर्त प्रतिसाद, वाव !, लयभारी!,ते बघ खतरनाक! नाईस!,, आपल्या महाबळेश्वर सारखं घनदाटजंगल.... गाडीच्या काचेच्या खिडकीतून दिसणारी निसर्गराजाची दौलत बघून मनात साठवत होतो... एकवेळ जंगलचा रस्ता संपूच नये असे मनात विचार तरंग यायचे...त्यावरही  गप्पा व्हायच्या.. एकदा तर एका छान ठिकाणी गाडी बाजूला घेऊन.. निवांत पणे निसर्ग सृष्टी न्याहाळत बसलो... सुरेख दृश्यांना  कॅमेऱ्याने चित्र बध्द केले.... निसर्गाच्या सान्निध्यात थोडावेळ विसावलो.... खूपच मनाला वनसृष्टीची भुरळ पडली होती.. जास्त वेळ थांबून उपयोग नव्हता . म्हैसूर शहर बघून वृंदावन गार्डनला जायचं होतं..... प्रवासातील अंतर कापत कापत दुपारच्या दरम्यान आम्ही म्हैसूर मध्ये आलो... आंध्रप्रदेश-तमिळनाडू करून आता  कर्नाटक राज्यात प्रवेश झाला.
__________________________________________&&&_
   ऐश्र्वर्यसंपन्न   म्हैसूर शहर चामुंडा टेकडीच्या पायथ्याशी आहे.इतिहासातील वाडियार संस्थानची राजधानी.जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ. म्हैसूर पॅलेस मधील दसरा महोत्सवाचा जगात नावलौकिक आहे. देशी विदेशी पर्यटक हा महोत्सव पहायला हमखास जातात.सॅंदल सोप,मोती साबण,चंदन सेंन्ट ,चंदनाच्या लाकडाच्या शोभिवंत वस्तू आणि शोपीसचे माहेरघर. किंमतीवान आणि दर्जेदार शोपीस आपली नजर खिळवून ठेवतात..खूपच मोठी बाजारपेठ आहे.. मोठाली सजवलेली शोरुम दालनं बघताना नामांकित अर्टिकल खरेदीचा मोह होतो.अप्रतिम डिझाईनच्या रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण ..

        आम्ही प्रथम श्री चामुंडा टेकडीवर श्री चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला गेलो.. पायथ्याचा अवाढव्य नंदी आपले लक्ष  वेधून घेतो.टेकडीवर जायला रस्ता  व पायऱ्याही आहेत.तेथून शहराचे विलोभनीय दृश्य दिसते.... देवळाच्या पुढे महाकाय स्वरुपात महिषासुराचा पुतळा आहे.मंदिरात काळ्या पाषाणाची मूर्ती असून . देवी दशभुजा धारीणी आहे.प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. राजघराण्याची कुलदेवता.
प्रवेशद्वारासमोर उंच गोपुर आहे.मनोभावे देवीचे दर्शन घेतले.तदनंतर टेकडी उतरून बाजारपेठेत आलो.गाडी पार्क करून साड्या खरेदीसाठी दुकानात गेलो.मी,पिंटू ,उम्या व वाडकर एका दुकानात तर बापू, विठ्ठल ,प्रमोदराव व फरांदे काका दुसऱ्या दुकानात गेले.. सेल्समनने बऱ्याच  विविध रेंजच्या व प्रकारच्या दाखविलेल्या.प्रत्येकाने  मनपसंत दोन-चार साड्या खरेदी केल्या...इतर दुकानातील शोपिस ,टेबलतारकेट व चंदन सेंन्ट खरेदी केले..उंची वस्तुंची पॉश दुकाने होती.म्हैसूरचे एक नंबरचे प्रेक्षणिय स्थळ "म्हैसूर पॅलेस" पहायला आलो. समृद्ध राजेशाही वास्तूशैलीची अप्रतिम कलाकृती शाही पॅलेस, गाईडने अप्रतिम शब्दात ऐतिहासिक वास्तू पॅलेस व दसऱ्याचे वर्णन ऐकविले. कलाभिरुची व सौंदर्यदृष्टी वाढविणारा राजवाडा  ,ऐश्वर्यसंपन्न ऐतिहासिक वास्तू. आपले लक्ष वेधून घेते.. बघताना मनाला भावते.. त्याकाळातील संस्थानाच्या गर्भश्रीमंतीची आणि सुबत्तेची ओळख होते.प्रेक्षणिय वास्तू आहे..
.दरबार हॉल,कल्याणमंडप , सिंहासन व इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या विविध वस्तू,शस्त्रे,हस्तदंती दरवाजे , फर्निचर व ऊंची पेहरावाचे  संग्रहालय पाहिले.. पॅलेस  व म्युझिअम बघून सगळे  खुश झाले.दसरा महोत्सवात  राजे महाराजे जनतेला पहाण्याचे आकर्षण असते.दसऱ्याला बहारदार शोभायात्रा (मिरवणूक) निघते. लोकसंस्कृतीचे  प्रतिबिंब महोत्सवात दिसते... छान पैकी सायंकाळच्यावेळी पॅलेसच्या सहवासात फोटोग्राफी केली.. आणि 
 प्रेक्षणिय वृंदावन गार्डन पहायला निघालो.




क्रमशः भाग--६२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड