माझी भटकंती हलेबीड बेलूर क्रमश.भाग ६५

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान






🛕🍀🛕🍀🛕🍀🛕🍀🛕🍀
             माझी भटकंती
  क्रमशः भाग- क्र.६५

 🔆 म्हैसूर ,उटी व गोवा ट्रीप
सन--२००३
 हलेबीड आणि बेलूर कर्नाटक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आम्ही म्हैसूर,उटी व श्रवणबेलगोला करून गोव्याला निघालो होतो..हसन जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर दोन प्राचीन काळातील प्रेक्षणिय पर्यटनस्थळे आपणाला पहाता मिळतात...असे एका पर्यटनप्रेमी मित्राने सुचविले होते....त्याच मार्गाने गोव्याला निघालो होतो.....
हलेबीड येथील प्राचीन काळातील स्थापत्य व वास्तूशिल्प कलेचा अद्भुत नजारा बघायला आवर्जून गेलो.येथील मंदिरे म्हणजे  स्थापत्यकलेच्या सौंदर्य आविष्काराची मानाची पाने आहेत.. होयसालेश्वर व केदारनाथ मंदिर बघताना आपण खरोखरच आश्र्चर्यचकित होतो.नक्षत्राच्या आकाराचे मंदिर आहे.दगडातून विविध कलांमधील देवदेवतांच्या मूर्ती सूक्ष्म नक्षीकाम करुन घडविल्या आहेत.होयसालेश्वर मंदिर भगवान शंकराचे मंदिर आहे.मंदिरातातील सर्वच भागात आतून व बाहेरून पशूपक्षी व देवादिकांच्या मूर्ती रेखाटल्या आहेत.त्यापैकी उल्लेखनीय शिल्प कलेचा नमुना म्हणजे शिवतांडव मूर्ती, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून पाऊस पासून लोकांचे केलेले रक्षण, गणपतीची मूर्ती,नंदी पहाताना.कुतूहल व उत्सकता वाढत जाते.पहारेकऱ्यांची शिल्पे सुध्दा नक्षीदार आहेत.मंदिराच्या खांबावरील नक्षीकाम आपल्याला मोहिनी घालते.
 तदनंतर आम्ही बेलूर पहायला गेलो.जसं हलेबीड आहे तसंच बेलूर आहे..हलेबीडच्या जोडीचे शहर केवळ ईश्र्वराच्या नावात बदल.इथं चेन्नकेशव मंदिर आहे.कला आणि शिल्प शैलीचा अद्भुत आविष्कार पहायला मिळतो.अवाढव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण चेन्नकेशव मंदिराकडे जातो.मध्ययुगातील राजा विष्णूवर्धन यांनी बांधलेले आहे.नक्षत्राच्या आकाराचे मंदिर.मंदिराच्या भिंतीवर आतून व बाहेरून सुबक नक्षीकाम केलेले आहे.नर्तिकेचे बहारदार नृत्य देखावा,नरसिंहाचे रौद्र रूप व दर्पणसुंदरी मूर्तीकलेत  जिवंतपणा दिसतो.कलाकुसरीचे वैभवशाली शैलीचे दर्शन येथील मूर्ती बघताना दिसते.
. बेलूर हे होयसळांच्या राजधानीचे शहर म्हणून मध्ययुगीन काळातील ओळखले जाते.अप्रतिम मंदिर शिल्पांची नजाकत बघायला मिळाली...
तदनंतर आम्ही कारवारमार्गे गोकर्ण महाबळेश्वरला निघालो..
क्रमशः
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

  1. बहारदार नक्षीकाम केलेले मंदिर अप्रतिम आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड