आठवणीतील अतिवृष्टी काव्य ९
आठवणीतील अतिवृष्टी
आभाळ फाटू लागलं
नभी ओथंबून आलं
वारा गर्जू लागला
धूवांधार वर्षाव झाला
पाणी वाढू लागलं
पाणी विस्तारु लागलं
नदीमाय दुथडीने वाहू लागली..
सगळ्यांची त्रेधातिरपिट उडाली
पुलाला घासून पाणी वेगात निघालं
बघणाऱ्याच्या काळजात धस्स झालं
खळाळत लोंढा धरणाकडं पळाला....
धरणात पाणी रुंदावू लागलं....
भविष्याचा संचय करु लागलं.....
तृणपाती डोंगरी दाटी करु लागली....
जित्रांबाचा चारा फोफावू लागला ...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment