माझी भटकंती हैद्राबाद कार म्युझिअम भाग क्र.६७
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे न
श्री.रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
🚲🏍️🛵🛴🏍️🛵🚲🚜🏍️
🚲 माझी भटकंती🚲
क्रमशः भाग-६७
सुधा कार म्युझिअम हैद्राबाद
दिनांक ९ नोव्हेंबर २०१९
〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️➖
जगातील विविध कंपन्यांनी नावाजलेले "सुधा कार म्युझिअम " बघताना फारच कुतूहल,अदभुत व मजेदार वाटले.. विविध झोपाळे,
बसायची बाके सुध्दा गाडीच्या आकारात आहेत. ते चालवूनही पहाता येतात. सायकलींचे विविध प्रकार पाहून तर खूपच आनंद झाला.
सुधाकर यादव नावाच्या एका अवलिया कलाकाराने आपल्या कल्पकतेने विविध प्रकारच्या चार चाकी गाड्या स्वत:हा नाविन्यपूर्णतेने तयार केलेल्या आहेत. जणू नवनिर्मितीच . विविध वस्तुंच्या मॉडेल रुपात ''वाहन " हा बेसधरुन अनेक गाड्या बनविल्या आहेत..त्यातील भलामोठा ट्रक,गाडीचे तिकिटघर , सायकल रिक्षा ,उंचच्या उंच बुलट व लांबलचक स्कुटर बघताच आपण त्यावर कधी बसतोय व फोटो काढतोय.असा फील निर्माण होतो.. विविध प्रकारच्या सायकली बघून नवल वाटते. संग्रहालयातील प्रत्येक गाडी बघताना फारच कुतूहल वाटते.तसेच आपण ज्या दैनंदिन व्यवहारात वस्तू वापरतो.त्या वस्तुंसारख्या दुचाकी,तिचाकी व चार चाकी गाड्या बनविलेल्या आहेत. विविध वस्तूंची निर्मिती कशी केली असेल याची उत्सुकता वाटते.
क्रिकेट बॅटची, बॉल ,शिसपेन्सिल,खोडरबर,पेन शार्पनर, पुस्तक व बॅडमिंटन रॅकेट व इतर खेळाचे साहित्य , फर्निचर अशा अनेकविध वस्तूंची गाडी केली आहे. ते सार्वजनिक ठिकाणी नवीन बनविलेली कार चालवून दाखवितात. सध्या त्यांनी कोरोना व्हायरस थीमची सूक्ष्म विषाणूच्या आकाराची कार तयार करून प्रबोधन केले आहे.हे टि.व्ही.वर पहायला मिळाले. सुधा कार म्युझिअमने गाड्या व सायकलींचे नवनिर्मितीचे संग्रहालय म्हणून लौकिकता मिळवली आहे.. अनेक हौशी पर्यटक या म्युझियमला आवर्जून भेट देतात..
प्रदर्शन पहाताना आम्हालाही खूप नवल वाटले...याही वस्तुंची गाडी झालीय...ती सायकल,तो फुटबॉल ही गाडीसारखा केलाय,छोटी ट्रेन पाहून बच्चेकंपनी जाम खुश झाली.. कल्पकतेने बनविलेल्या गाड्या बघताना तर खूपच नवल वाटले.हे संग्रहालय पहायला शुल्क आकारले जाते.प्रत्येक बनविलेल्या गाडीची माहिती प्रदर्शित फलकावर आहे... विशेष दिनाचे औचित्य साधून त्या दिनाचे महत्त्व प्रसारित करण्यासाठी त्या थीमची गाडीच बनवून ते रस्त्यावर प्रदर्शित करुन नंतर संग्रहालयात ठेवतात.उदा. जागतिक महिला दिन, एड्सदिन इत्यादी..सन २०१० पासून संग्रहालय पहायला सुरू झाले आहे.स्व:निर्मित गाड्यांचा कलाविष्कार पाहताना आपण थक्क होतो.
सुपर संग्रहालय.ते पाहून नामांकित पशुपक्षी संग्रहालय पहायला निघालो.....
🛴🚲🛴🚲🛴🚲🏍️
क्रमशः भाग-६७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
श्री.रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment