निसर्ग सौंदर्य कोंढावळे शाळा परिसर पावसाळा ६



          पावसाळा
     नभी मेघ दाटून आले...
कुंद वातावरण दाटले ....
       रिमझिम बरसात सुरू झाली....
निसर्गाची भुरळ पडू लागली.....

        गवताची पाती फुटू लागली.....
झाडांची पालवी चकाकली....
      जलधारा कड्यातून डोकावली...
  सृष्टी हिरवाईत रंगू लागली..

मृदेचा गंध दरवळू लागला....
वाऱ्याचा वेग वाढू लागला...
 आसमंत नभी  उजळला....
पाऊस वर्षावूू लागला...

वर्षा सहलीचा स्वप्नध्यास ....
बघण्या डोंगर रानची आरास....
तरुणाई मनसोक्त भिजण्या खास...
दुचाकीवरून करती प्रवास....


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई.

प्रतिक्रियात्मक रचना


        

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड