माझी भटकंती दक्षिण भारत सहल-तिसरा दिवस श्रीशैलम भाग क्र--५७

🌱🛕🌱🛕🌱🚩 
माझी भटकंती
भाग क्र--५७
                दक्षिण भारत
सन २००१
               तिसरा दिवस
🍂♾️🍂♾️🍂♾️🍂♾️🍂♾️
                श्रीशैलम

  प्रातःकाळी लवकर जाग येणाऱ्यांनी इतरांना गुड मॉर्निंग करुन झोपेच्या तंद्रीतून जागे केले . शुचिर्भूत होण्यासाठी  अंघोळीसाठी नदी अथवा तलाव कुठे आहे.  हे जवळच्या  माणसांना विचारले
, त्यातल्या एकाने सरळ बोट दाखवत 'राईटअ ऽऽऽ ' म्हणाला . त्यादिशेने निघालो.सुंदर तलाव होता.जास्त वर्दळ नव्हती. सकाळच्या प्रसन्न वातावरणात थंडगार पाण्यात  मस्तपैकी पोहलो.डुंबायला मजा आली.. चोळून मोळून अंघोळ केली.बऱ्याच दिवसांनी तलावात पोहायला मिळाले.
नंतर मी व उमेश सोडून बाकीचे तयार व्हायला लगेच गाडीकडे गेले.आम्ही दोघेही स्नान उरकून परिसर बघत टंगळमंगळ करत ,रमतगमत निघालो.कॅमेरा गाडीत राहिल्याने फोटोही काढता आले  नाहीत.
गाडीजवळ आलो तर तिथं कोणीही नाही.दरवाजे उघडून बघितले तर गाडी लॉक.अंदाज आला सगळे देवदर्शनाला गेले असतील..पण आपलं काय? आपली  सगळे कपडे गाडीत.वैताग आला नुसता. दोनएक तास आहे तसेच ओल्या कपड्यातच गाडीजवळ थांबून, कधी येरझारा घालत, तर कधी पायऱ्यावर बसून वाट पहात होतो..वैताग आला.नाईलाज झाला. करणार काय. 'आपलीच गंमत आपल्यावर बेतली'असं उमेशला बोललो.,... अंगावरील ओली कपडे वाळली..तरी पत्ता नाय बाकीच्या मित्रांचा...लय चिडचिड झाली...
 ड्रायव्हरने तरी थांबायला पाहिजे होते.असं दोघांचं मत.....वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.काहीच सुचेना.....

      देवदर्शन करून ही मंडळी उगवली .कावाकावी, चिडाचिडी झाली... ड्रायव्हरलाही बोललो.".तो म्हणाला मी तुम्हाला शोधायला आलो होतो.तुम्ही तलावाजवळ दिसलानाय मग देवळात गेलो..."' आमची भुनभुन चालूच होती.बाकी सगळेजण शांत होते..मग विठ्ठल आणि फरांदे काका म्हणाले,' तुम्ही आमच्या मागे न येता कुठं गेला होता..तुमची थोडावेळ वाट बघून गेलो...' चला आमचीच चूकी... म्हणून विषयावर पडदा टाकला.
 इतरांनी नाष्ट्याची तयारी सुरू केली होती..मग  दोघेही तयार होऊन  देवदर्शनाला गेलो.... देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ बघतोय तर काय? दर्शनाला भली मोठी रांग बघितल्यावर उमेश
म्हणाला ,'राहू द्या गुरुजी आता देवळात जायचं.' ओके  ठीक आहे म्हणालो.
मग कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरणार एवढ्यात एक बडेप्रस्थ वाजत-गाजत देवदर्शनाला डायरेक्ट आमच्या पुढून  निघालेले होते..मग मुखाने नामस्मरण करत व टाळ्या वाजवत त्यांच्या मागे देवळात तसेच घुसलो अन्  दर्शन घेऊन तकाट माघारी फिरलो...
 श्री शैलम ,सेलम डोंगरावरील ज्योतिर्लिंग शिवमंदिर श्री मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध . दक्षिण भारतातील प्रति कैलास.  श्रीशैलम विषयी अनेक आख्यायिका आहेत. प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे...प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात पटकन आणि  सुखद दर्शन झाले.. दिवसभर उत्साहवर्धक प्रवासाला ऊर्जा मिळाली.. बारा ज्योतिर्लिंग शिवमंदिरापैकी एका धार्मिक तीर्थक्षेत्राचे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले.... मनःशांती लाभली.   ॐ ओम नमः शिवाय  । हर हर महादेव...
येथे छत्रपती शिवाजी महाराज  दर्शनासाठी आले होते.. त्यांनी यात्रेकरूंना धर्मशाळा बांधलेली आहे..महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते... कृष्णा नदीला इकडे पाताळगंगा नाव आहे...सेलम धरणही पहाण्यासाठी हौशी पर्यटक येतात...इकडची मंदिरांची शैली वेगळी आहे.एकावर एक छोट्या मनोऱ्यासारखी रचना दिसते....

    आम्हला लगेच आलेलं पाहून दोघातिघांनी  विचारले.लगीच कसं काय माघारी आला..कलश दर्शन केलेना?.. खरं सांगा, असं विचारलं.उमेश म्हणाला,नाय  बाबांनो  देवळात आत जाऊन दर्शन घेतले...कपाळाचे भस्म बघा.. देवळाच्या आतील भागाची माहिती दिली आणि तदनंतर..दर्शन कसे झाले..याचं वर्णन सांगत असताना वाडकरांनी कांदेपोह्याची डीश हातात दिली.... सगळेजण नाष्टा करून व कडक चहा घेऊन ओम् नमः शिवाय नामघोष करून पुढील प्रवासाला तिरुपती बालाजीला निघालो.... वाटेतील एका एसटीडी बुधवार थांबून घरी फोनवरून सहलीची माहिती दिली.खुशाली विचारली..

क्रमशः भाग-५७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड