माझी भटकंती हैद्राबाद चारमिनार भाग क्र.५५

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान



माझी भटकंती
 क्रमशः भाग-५५

दक्षिण भारत

सन २००१
दुसरा दिवस

हैदराबाद चारमिनार , म्युझिअम  व किल्ला

.   बिर्ला  टेंपल बघून आम्ही   तेथून पुढे  शहराच्या मध्यवर्ती भागातील हैद्राबादची प्रसिद्ध जागतिक दर्जाची नामांकित  वास्तू  चारमिनार पहायला निघालो.यापुर्वी भुगोलाच्या पुस्तकात बघितलेले चित्र प्रत्यक्ष बघायला मिळणार याचा आनंद होताच.अलिकडेच गाईडने गाडी थांबवली व "समोर चालत चालत पुढे जाऊन चारमिनार  पाहुन या".असे सांगितले.भरपूर गर्दीचा परिसर होता.वहानांची आणि माणसांची वर्दळ भरपूर होती. आपल्या पुणे येथील तुळशीबागे सारखीच..
दुतर्फा  हैद्राबाद मधील प्रसिध्द वस्तूंच्या दुकांनांची रेलचेल होती.खाद्यपदार्थ,कटलरी ,साडी,ड्रेसवेअर,.भांडी, बेंनटेक्स ज्वेलरी आणि खेळणी, इत्यादी दुकाने होती. हैदराबाद मधील  'मोती ज्वेलरी ' फेमस आहे.
पर्यटकही खरेदी करताना दिसत होते...आम्ही चालत चालत पुढे गेलो... अप्रतिम वास्तू  चारमिनार सुंदर वास्तू कलेचा उत्तम नमुना.इस्लामिक शैलीतील वास्तुकला. ते स्मारक व मशीद म्हणूनही प्रसिद्ध आहे.उंचमिनारावरील शिल्पकलाही उठावदार पणे दिसत होती... वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रवेशशुल्क आकारले जाते.चारमिनारच्या सानिध्यात मस्तपैकी फोटो काढले...
          तेथून जवळच असलेल्या सालरजंग म्युझिअम पहायला निघालो..या म्युझिअमची माहीती गाईड सांगत होता... पाहिलेल्या स्थळांवर आम्ही चर्चा करत होतो....सालरजंग म्युझिअम भारतातील नामांकित संग्रहालयापैकी एक आहे., राष्ट्रीय संग्रहालय म्हणून लौकिक आहे.तीन इमारतीत व ३८ दालनात हे मुझिअम आहे.जगातील प्राचीन वस्तुंचे प्रदर्शनीय संग्रहालय आहे.विविध हस्तलिखितांच्या प्रती, फर्निचर, पेंटिंग्ज,मुर्ति व विविध आकारातील भांडी आहेत.मुझिअम पहाताना उदभुतता आणि नवल वाटते...वेगवेगळ्या देशांतील नानाविध वस्तु पहायला मिळाल्या... अप्रतिम संग्रहालय...दोन तासांच्या प्रदीर्घ उभे राहून प्रदर्शन  पहाणीमुळं पोटात कावळे ओरडायला लागले... सगळ्यांनी  एकत्र बसून छान पैकी घरचा फराळ केला.फळे खाल्ली.गोलकुंडा किल्ल्याकडे निघालो.... पायऱ्या चढत किल्ल्यावर पोहोचलो गाईड किल्ल्याची माहिती सांगत होता...ग्रानाईटच्या डोंगरावर बांधलेला किल्ला सर्वात जुना आहे.वास्तुकला पाहून अचंबित झालो.आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांच्या उंचीची  आठवण झाली..हा किल्ला नादध्वनी साठी( ईको साऊंड सिस्टीम )साठी प्रसिद्ध आहे.... आवाजाचा प्रतिध्वनि उमटतो. किल्ला पाहून खाली आलो.... गाईडचे पैसे दिले.  त्या ने चांगले सहकार्य केल्याबद्दल चहापाण्याला पैसे दिले.आम्ही नागार्जुनसागर धरणाकडे प्रस्थान केले... 
क्रमशः भाग---५५ . भेटूया पुढील भागात..

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
लेखन दिनांक ८मे २०२०





Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड