माझी भटकंती दक्षिण भारत सहल-पाचवा दिवस कोईम्बतूर ते उटी. भाग क्र. ६०
दक्षिण भारत सहल-
🌱🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁
माझी भटकंती
क्रमशः भाग क्र.६०
दक्षिण भारत
सन २००१
पाचवा दिवस
♾️☘️♾️🍀♾️🍀♾️🍀
🌀कोईम्बतुर ते उटी
♾️🍀♾️🍀♾️🍀♾️🍀
थंडीचे दिवस होते.तिथल्या नदीवर जाऊन मस्तपैकी पोहलो.बऱ्याच दिवसांनी नदीत पोहायला मिळाले... छान व सुंदर पायऱ्यांचा घाट होता.नंतर गाडीजवळ येऊन शिरा आणि कांदा - बटाटा भजी नाष्ट्याला बनवली.सगळ्यांनी नाष्टा केला.ब्लॅक टी घेऊन कोईम्बतुर बाजारपेठेत निघालो...हे शहर साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.. चौकशी करत बाजारपेठेत आलो... दुकाने उघडायला नुकतीच सुरुवात झाली होती... गाडी पार्क केली. जवळच्या एका साडीच्या दुकानात साडी खरेदीसाठी गेलो...शोरुम मध्ये उंची व भारी किंमतीच्या साड्या दिसत होत्या.. सेल्समनला पाचशे ते हजार रेंजच्या दाखवायला सांगितल्या..पसंद करुन खरेदी केली.मीही सहलीची आठवण म्हणून घरच्यांना तीन साड्या खरेदी केल्या. तदनंतर शेजारच्या चांदीच्या शोरुमध्ये गेलो.विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू सुबक नक्षीकाम केलेल्या होत्या.मी देव्हाऱ्यात ठेवायला उदबत्तीघर घेतले... इतरांनी आवडीच्या वस्तू खरेदी केल्या.....
आम्ही उटीला निघालो... घेतलेल्या वस्तुंवर गाडीत चर्चा.दराची तुलना,फिक्स रेट, गॅरंटी यावर गप्पागोष्टी करत..आमची गाडी अवघड घाटरस्त्याने एस,व्ही व यू आकाराची वळणे घेत, हिरवेगार डोंगर,दऱ्या ,उतरत्या डोंगर पायऱ्यांवरील चहाचे मळे व
ओहळनाले बघत , थांबून फोटोग्राफी करत..धरतीचे निसर्गसौंदर्य न्याहाळत प्रवास चालला होता.
देशातील नामांकित हिलस्टेशनला उटी(उदकमंडलम) दोन तासाच्या प्रवासानंतर पोहचलो... अवर्णनीय ठिकाण..धरतीवरील नंदनवन दिसतं होतं.
देशविदेशातील पर्यटकांची गर्दी... तिथंली कितीतरी ठिकाण प्रेक्षणिय आहेत... विलोभनीय निसर्गाचा आविष्कार पहात होतो.आत्तापर्यत केवळ सिनेमांमध्ये पाहिलेले वैभवशाली निसर्गाचे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मिळाल्यावर आनंदी आनंद... निसर्गसौंदर्य पाहून सगळे खुश.. दुपारी दोन वाजता हवेत गारवा जाणवत होता. थंडगार वाऱ्याची झुळूक आली की हुडहुडी भरत होती.. फोटोग्राफी केली. कॅमेऱ्यातील एक रोल एकाच जागी संपला.... तिथं आम्ही रोझ गार्डन ,बोट हाऊस व बोटॅनिकल गार्डनला भेट दिली... सगळीकडे हिरवेगार गालिचे असलेले डोंगर दिसत होते.... पश्र्चिम घाटाची डोंगररांग क्वीन आॅफ साऊथ इंडिया वाटत होती.रोझ गार्डन मध्ये अनेक प्रकारची गुलाबाची फुलं, त्यांच्या विविध आकारातील रचना,लॉन व फोटोगॅलरी पाहून मन प्रसन्न व आनंदी झाले...फुलांचा वेगळाच आविष्कार दिसत होता.. रंगीत फुलपाखरे फुलांवर गुंजारव करतानाची दृश्ये मनमोहक दिसत होती..पक्ष्यांचा किलबिलाट कानी येत होता.मनमोहक वातावरण ...फुलांचा रंगीबेरंगी गालिच्या दिसत होता.
मनमुरादपणे आनंदानुभव लुटून मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवत होतो.मस्तच लोकेशन....
लेक जवळच बोट हाउस होते.तलावातील बोटिंगचा नजारा मस्तच दिसत होता.बऱ्यापैकी लेकवर गर्दी होती...हौशी तरुण पर्यटक बोटिंगचा आस्वाद घेऊन मौजमजा करत होते.आमचं नेत्रसुख घेण्याच काम चालू होतं. गावाकडे नदीत आणि विहिरीत मनसोक्त पोहणाऱ्यांना बोटिंगची करण्याची उबळ आली नाही.
तलावाचा कॅनव्हास शोभनीय दिसत होता...नजरेत भरण्यासारखी ठिकाणं....
🍃🔆🍃🔆🍃🔆🍃🔆🍃
क्रमशःभाग६०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com

Best
ReplyDelete