सेवा गौरव लक्ष्मण कोंढाळकर सर




🔆🍀🔆🍀🔆🍀🔆🍀🔆 
         🔅 सेवागौरव 🔅

      प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ,आपल्या  सर्वांचे शिक्षकमित्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलारवाडीचे मुख्याध्यापक श्रीमान  लक्ष्मण शंकर कोंढाळकर सर आज नियत वयोमानानुसार प्रदीर्घ शिक्षक सेवेतून निवृत्त होत आहेत.. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याची अनुभुती आणि महतीचा गौरव व्हावा म्हणूनच भाषणातून व्यक्त होण्याऐवजी लेख .कारण सद्यपरिस्थितीत सोहळा संपन्न करणे अशक्य आहे.
   🌹श्री कोंढाळकर सरांची बहुतांश सेवा वाई तालुक्यातील दुर्गम भागातील श्री मांढरदेवी पठारावरील शाळांत झाली. आहे.त्याकाळी रस्त्यांची गैरसोय होती.. त्यांच्या डुईचीवाडी गावाला तर वेरुळीतून चालत जावे लागायचे.सध्या चांगला रस्ता झाला आहे.
    नवीन शैक्षणिक धोरण सन १९९९मधील स्मार्ट पीटी प्रशिक्षणात ओळख झाली.
शांत , समंजस ,कुटूंबवत्सल आणि धार्मिक वृत्तीचे आमचे सहकारी मित्र कोंढाळकर सर .
          त्यांचा आणि माझा स्नेहबंधाचा परिचय अलिकडे मेणवली केंद्रात ते  प्रशासकीय बदलीने शेलारवाडी शाळेत आल्यावर झाला.
     'आपण भलं आणि आपली शाळा भली ' असं समजून सरळमार्गी काम करणारे. एखादा विषय माहित नसल्यास समजून घेणारे.विद्यार्थ्यांत रममाण होऊन त्यांच्या शिक्षणासाठी आपण आहोत हीच भावना व्यक्त करणारे सर. संघटनेच्या मिटिंगमध्ये परखडपणे विचार मांडणारे सर.केंद्रात  स्विकारलेली  जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करणारे सर. शैक्षणिक कार्य तत्परतेने , तळमळीने आणि आवडीने पूर्णत्वास नेणारे.
सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजहितासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व.लग्नसोहळ्यात
मंगलअष्टका सुस्वर आवाजाने गाऊन वाहव्वा मिळविणारे कोंढाळकर सर .मेणवली केंद्रात कोंढाळकर सर आणि फरांदे सर एकमेकांचे खाससह्रदयी मित्र.सहकार्य वृत्तीने नेहमीच  कार्यरत असत.
    आज श्रीमान लक्ष्मण शंकर कोंढाळकर सर प्राथमिक शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या सेवेचा गौरव  म्हणून प्रारंभीच्या हार्दिक शुभेच्छा❗
    सर, आज आपण आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं आमचं मैत्रेयी नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या  संगतीने  घालवलेले अनेक प्रासंगिक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आठवतच राहील आपले भावी  आयुष्यही असंच सुखसमाधानाचं व आरोग्यदायी जावो  हीच सदिच्छा आणि आपले  शुभचिंतन आणि आपणास सेवानिवृत्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗

🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸
             शुभचिंतक
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

*सेवानिवृत्ती ? छे* !!!!!
*ही तर क्षणभर विश्रांती ! नवीन जगण्याची आवृत्ती*
*मनसारखे जगणे आता ,आनंदाची अनुभूती*

*निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासु अन दुसऱ्या डोळ्यात आसु*
पण,
*निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं , दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं ,गुंतवायचे नसतात हातात हात , केवळ स्पर्श सांभाळायचा असतो मखमली ह्रदयात*.
""मनातल्या मनात उलगडणारा एक नाजुक कप्पा आहे ,याच कप्प्यात  जपून ठेवा आमच्या मनस्वी शुभेच्छा.""
*इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वराने निरोगी व सुखसमृद्ध जीवन प्रदान करावे, व ते आयुष्य असेच वाढत रहावे हीच आमुची सदिच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*निरोप देणं आणि तो घेणं हा एक केवळ शिष्टाचार नसतो तर तो आपल्या संस्कृतीचा सहजसुंदर, भावस्पर्शी अविष्कार असतो....आज आपल्या मेणवली केंद्रसमूहातील सर्वांच्याच लाडक्या, ज्येष्ठ ,हसतमुख शिक्षिका श्रीमती रोहिणी राजन निकम या सेवानिवृत्त होत आहेत....आजच्या या प्रसंगी त्यांना ही आदरयुक्त शब्दपुष्पांजली....*🖋️🖋️🖋️
 
       *निकम मॅडम म्हणजे चैतन्याचा अखंड वाहणारा स्रोत च जणू...😊😊कधी नाराजी नाहीच...जिथे जाणार तिथलं वातावरण आपल्या असण्याने अगदी भारावून टाकणार...त्यात जोडीला त्यांच्या सुस्वर आवाजाची साथ...🎼🎼म्हणजे मैफिलीची पर्वणीच जणू...शिबीर असो व ट्रेंनिग,मीटिंग असो वा एखादी सहल , निकम मॅडम असल्या म्हणजे उत्साहाला उधाण हे ठरलेलंच...मॅडम आपला हा स्वभावच आपल्या आजवरच्या जपलेल्या नातेसंबंधांचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही...आयुष्यात आनंदाबरोबच आलेले दुःखाचे कडू घोट ही त्यांनी तितक्याच समर्थपणे पेलले... हे ही विशेषच..साऱ्यांना च हे जमतं असं नाही..यासाठी आपणांस त्रिवार सलाम...*🙏🏼🙏🏼🙏🏼
     *गेले 30 वर्षे हजारो विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, त्यांच्यात जागवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य ज्यांच्या हातात निर्माण केलं ...त्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी देऊन हळव्या अंतःकरणानं व जड पावलांनी शाळेची वेळ ओलांडण्याचा आजचा हा क्षण म्हणजे decorated भाषेत send off..*👏🏼👏🏼
   *आभाराचे भार कशाला...*🙏🏼🙏🏼
   *सत्काराचे हार कशाला...*💐💐
   *एकमेकांच्या हृदयात राहू...या घराला दार कशाला...*🏡
*आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं...पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधित राहील... तुमचं इथून पुढील आयुष्य ही असंच सुखासमाधानाने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 स्मिता जाधव मॅडम वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड