माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग ७०
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
Lifestyle
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
माझी भटकंती
क्रमशः भाग--७०
रामोजी फिल्मसिटी
१० नोव्हेंबर २०१९
माझी भटकंती
क्रमशः भाग--७०
रामोजी फिल्मसिटी
१० नोव्हेंबर २०१९
🕺🏻💃🏻 केव्ह व मुव्ही मॅजिक🕺🏻
CAVE AND MOVIE MAGIC
CAVE AND MOVIE MAGIC
परिसरातील विविध आकर्षक आणि डेकोरेटिव्ह कमानी , नक्षीदार खांब , मूर्ती,चित्रे आणि पुतळे पहात पहात आम्ही छायाचित्रण थिएटरकडे निघालो... जाताना आकर्षक संगीत वाद्यांच्या संगतीत (वीणा व तबला) मस्तपैकी फोटोग्राफी केली.सगळीच ठिकाणं फोटोसेशनला जबरदस्त होती..... कोणत्याही थिएटरमध्ये जाताना अडचणी आल्यास चौकशी साठी स्वतंत्र सोय आहे.माईकवरुन इंग्रजीत निवेदन केले जाते.जागोजागी कोठे कोठे काय आहे याचे दिशादर्शक नकाशे लावलेले आहेत.तसेच सिक्युरिटी गार्डही माहिती विचारली तरी सांगतात.कुठल्याही जागेवर आपण मस्तपैकी फोटोग्राफी करू शकतो.असं लोकेशन...रांगेने आम्ही फोटो स्टुडिओत आलो.तिथं वैयक्तिक फोटो क्लिक करुन स्लीप दिली.फोटो पाहिजे असेलतर शुल्क भरुन मिळेल असं चौकशी केल्यावर कळले. रांगेने छोट्याशा रेल्वेच्या डब्यात बसलो... रुळावरून डबा पुढे पुढे जावू लागला अन् काय वर्णावे... छोट्याशा अंधाऱ्या गुहेत आमचा प्रवेश झाला.जणूकाही जादूई नगरीचा फेरफटका मारतोय असाच भास झाला. खरंच अबब, अप्रतिम छायाचित्रण थिएटर होते.असंख्य दृश्ये.बघावे तिकडं क्षणाक्षणाला वेगवेगळी दिसणारी जादूई दृश्यचदृश्ये .प्रसंगाप्रमाणे व्यक्तिरेखा, पेहराव,लाईट इफ्टेक्स आणि संगीत.बुलगाणी दाढी डोक्यावर शंकूची टोपीआणि हाताने वाद्य वाजविणारे शिल्प बघून अस्सल खरोखरीचा वादकच वाटला. जणू काही मायावीनगरीचा स्वर्गच ..स्वप्नात तर नाही ना असं काही वेळा वाटायचं...अप्रतिम रचना आणि कृतीयुक्त सादरीकरण.. त्याला साजेसा आवाज.नेत्रदीपक लाईटिंग प्रत्येक दृश्य पहाताना कौतुकास्पद प्रतिक्रिया मुखातून उमटतातच ,'अप्रतिम, वंडरफुल लय भारी.'.. फोटोग्राफी करावीच वाटते तिथं . अनेक दृश्ये
मोबाईलमध्ये चितारली.तदनंतर मंत्रमुग्ध केलेल्या छायाचित्रण केव्हमधून आम्ही बाहेर आलो.बाहुबली सिनेमातील सिंहासन पाहिले.विशेष म्हणजे सिंहासनावर विराजमान होऊन फोटोग्राफी करायला आम्हाला पाच मिनिटे वाट पहावी लागली.. फोटो काढायला झुंबड उडाली होती एवढी गर्दी तिथं होती. दिल खुश हुआ वो सारा नजारा देख के | मनाला भुरळ घालणारी मनमोहक लोकेशन्स.
मोबाईलमध्ये चितारली.तदनंतर मंत्रमुग्ध केलेल्या छायाचित्रण केव्हमधून आम्ही बाहेर आलो.बाहुबली सिनेमातील सिंहासन पाहिले.विशेष म्हणजे सिंहासनावर विराजमान होऊन फोटोग्राफी करायला आम्हाला पाच मिनिटे वाट पहावी लागली.. फोटो काढायला झुंबड उडाली होती एवढी गर्दी तिथं होती. दिल खुश हुआ वो सारा नजारा देख के | मनाला भुरळ घालणारी मनमोहक लोकेशन्स.
तदनंतर आम्ही रामोजी मूव्ही मॅजिक पहायला निघालो.टोलेजंग कमानी, सगळीकडे अप्रतिम स्वच्छता दिसत होती.
प्रशस्त रस्ते, विविधांगी रचेनेची कारंजी पहात पहात आम्ही प्रत्यक्ष सिनेमा कसा बनतो याचे प्रात्यक्षिक तीन थिएटरमध्ये बघायला गेलो.हौशी पर्यटकांपैकी उस्फूर्तपणे दोघातिघांना बोलावून घेऊन फिल्म कशी बनवतात त्याचे प्रात्यक्षिक सादर केले.संगीत, छायाचित्रण व आवाज कसा देतात याविषयी सोदाहरण माहिती देवून फिल्म ही दाखवितात..
आमचं चालणं, बघणं आणि फोटो काढणे सुरुच होतं . आता एक नंतर बसने आऊटडोअर शुट स्थळे बघायला जाणार होतो.एकतास वेळ होता.त्यात आम्ही हॉटेलमध्ये पे अँड ऑडर पध्दतीने लाईटली लंच घेतले.थोडावेळ एका बागेतील झाडाखाली एका बाकड्यावर बसलो होतो.सहज नजर गेली शेजारील बाकड्याजवळ चॅर्ली चॅप्लिनचे अॅक्शनशिल्प होते.मग काय त्याच्यासहवासात मस्त पोजमध्ये फोटोग्राफी केली..स्टोन स्टॅच्यूजवळ फोटो काढले... थोडावेळ विसावलो.
Comments
Post a Comment