माझी भटकंती बनेश्वर भाग क्र..७७
🌱🍀🍃🌱🍀🍃🌱🍀🍃
माझी भटकंती
क्रमशः भाग --७७
🛕 बनेश्वर 🛕
🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸
प्रवास दिनांक १७ फेब्रुवारी २०२०
➖〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️
फॅमिली टूर
भीमाशंकर व महादेव वन भटकंती साठी मित्रांसमवेत जाण्याचं प्लनिंग सुरू होते...त्यातच चिरंजीव मित्राच्या लग्नानिमित्त चारपाच दिवसांची रजा काढून आलेला होता...त्याच्याशी अगोदरच चर्चा केली होती.सकाळी लवकरच पप्पूच्या गाडीने फिरायला बाहेर पडलो.. नसरापूर फाट्यावरुन बनेश्वर कडे निघालो. शंकराचे देवस्थान व जवळच भोर उपविभागाचे वनपर्यटन केंद्र दोन्ही पाहून पुढे जावूया. असं नियोजन होतं. पप्पूने मंदिरापुढे गाडी पार्क केली. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता. वनश्रीने नटलेले अप्रतिम ठिकाण आहे.त्याला वन पर्यटनाची भटकंतीची जोड मिळाल्याने सर्वत्र हिरवेगार दिसते.प्रवेशद्वारातून मंदिरात गेल्यावर आपल्याला चारजलकुंडे दिसतात...समान पातळीवर असणारे पाणी आणि त्यात मुक्तपणे संचार करणारी कासवे बघायला तिथच थांबलो.तदनंतर मंदिरात गेलो.हेमाडपंथीय शैलीचे मंदिर संपूर्ण दगडी बांधकाम. कमान , सभामंडप आणि गाभारा स्वरुपात आहे.देवदर्शनाला पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जावे लागते.. सकाळच्या रम्य आणि भक्तीमय वातावरणात मुखाने 'ओम नमो शिवाय' मंत्र म्हणत शांततेत जोडीने दर्शन घेऊन...एक प्रदक्षिणा केली... गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस गायमुख व सभामंडपा शेजारी नंदी आहे.सभोवताली गर्द वनराई असल्याने प्रसन्न वाटले.मग शेजारील वनरोपवाटिका पहायला प्रत्येकी २० रुपये शुल्क भरून निघालो.. झाडे व वेलींचा उपयोग करून छानपैकी प्रशस्त उपवन बनविले आहे.फिरायला छान रस्ता. जंगली पक्षी, सरपटणारे प्राणी व जंगली प्राण्यांची चित्रे नावासह जागोजागी पहायला मिळाली. विरंगुळयासाठी बागेत कलात्मक पद्धतीने फुलझाडे व वेलींचा उपयोग केलेला आहे.औषधीवनस्पतींचे संवर्धन केले आहे..बागेत निवांतपणे बसण्यासाठी जागोजागी बाके आहेत..वनरोप वाटिकेच्या मागील बाजूस धबधबा व ओहळ आहे.श्रावणात येथे वर्षासहलीला तरुणाईची वर्दळ असते. तर भाविक श्रावणी सोमवारी दर्शनासाठी येतात.बनेश्वर म्हणजे वनातील ईश्वरच.अनेक लोकेशनवर मस्तपैकी फोटोग्राफी केली..वनविभागाने वनराईतून फेरफटका मारायला मस्तपैकी लोकेशन तयार केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळ्यासाठी शांतता प्रिय ठिकाण.
वनाच्या वरील बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणीआहेत...ती पहाताना अभेपुरी शाळेची सहल पुण्याला आयोजित केली होती. त्याची आठवण मनात आली..
तेव्हा बनेश्वरला आलो होतो... वनराई व रोपवाटिका बघून आल्यावर खेळणी बघताच सगळी मुलं त्या खेळण्यावर तुटून पडली होती.मनसोक्त खेळण्यांशी खेळत होती... खुप मजा चालली होती.. आनंदाने आवाज करत खेळत होती.शेवटी त्यांच्या आनंदावर विरजण घालून.त्यांना गाडीत बसायला लावले..तरीही काहीजण सर एकदाच,सर मला आत्ताच झोपाळा मिळालाय... दोनदाच झोका घेऊ द्या.असं आर्जव करीत होते.. मुलांच्या भावविश्वाचा उलगडा झाला..त्यांचे मन तिथंच खेळायला रेंगाळत होतं.तो प्रसंग दोघांना सांगत सांगत गाडीजवळ आलो.
तदनंतर आम्ही हायवेला येऊन सिंहगडाकडे निघालो..
क्रमशः भाग--७७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment