माझी भटकंती श्रवणबेलगोला ते ओझर्डे भाग क्र.६४
💫🍂💫🍂💫🍂💫🍂💫
माझी भटकंती
क्रमशः भाग-६४
🛕दक्षिण भारत 🚩सन २००१
सातवा दिवस
🍀❄️🍀❄️🍀❄️🍀🍀🌸
श्रवणबेळगोला
म्हैसूरला सकाळी नाष्टा चहापाणी उरकले. खरेदी केलेल्या साहित्याची बांधाबांध केली. नियोजित पर्यटनस्थळे बघितल्यावर आता घराची ओढ जाणवू लागली होती.. कधीतरी एस.टी.डी.मधून घरी फोनवरून संपर्क व्हायचा...संक्षेपाने सहलीची माहिती देत होतो.
परतीच्या मार्गाचे आमचे प्रस्थान श्रवणबेलगोला कडे होते.. नेहमीच्या कामातून स्वता:साठी वेळ काढून विरंगुळा,भटकंती आणि प्रसिध्द स्थळांना भेट द्यावी.. विविधतेने नटलेल्या भारताचे दर्शन घडावे म्हणून ट्रीप आयोजित केली होती.... नेहमीच्या मित्रांसमवेत पहिलीच ट्रीप होती.. चेष्टा मस्करी करत... मौजमजेने आनंद घेत आमचा प्रवास व्हायचा.श्रवणबेलगोला येथे पोहोचलो..
हासन जिल्ह्यातील विंद्यगिरी पर्वतावर श्रवणबेलगोला येथे बाहुबली गोमटेश्वराची प्रचंड उंच मुर्ती पहायला मिळाली.. अखंडपणे दगडात कशी कोरली असेल याचे नवल वाटते.हे जैनधर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.जागतिक पर्यटनस्थळ म्हणूनही याचा नावलौकिक आहे.मुर्तीच्या पायथ्याशी मराठी व कन्नड भाषेत शीलालेख आहेत.मुर्तीच्या सभोवताली छोटी छोटी मंदिरे आहेत...अद्भूत व धार्मिक तीर्थक्षेत्रला भेट देवून आम्ही हसन मार्गाने परतीचा प्रवास सुरू केला.....शिल्लक दिवाळी फराळ व शेंगा खात.फळांचा आस्वाद घेत..हसतखिदळत गप्पामारत मजेत होतो. रात्रीचं रुटीनप्रमाणे ओपन रोडवर पंपाजवळ अथवा एखाद्या धाब्याजवळ छान पैकी जेवण बनवून यथेच्छ ताव मारला होता..लांबपल्ल्याचा प्रवास सुरू झाला. रात्रीचा प्रवास रस्त्यावरील बोर्ड पाहत ,इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना विचारित कडूरगावा वरुन दावणगिरीला पुणे --बंगळूर हायवेला आलो... हायवेला कुठेतरी पहाटेचा अपघात झाला होता.ट्रफिक जाम झाले होते.
त्यामुळे बराच वेळ गाडीतच थांबावे लागले.वाटेतच एका धाब्यावर अंघोळ करुन फ्रेश झालो. बटाटा व कांदा भजी तयार केली.नाष्टा उरकला.पुढील प्रवास सुरू..सगळे ड्रायव्हरचे कौतुक करत होते.एकट्यानेच सात दिवस गाडी व्यवस्थित चालविली होती...पुढे विठ्ठल व शिवाजीराजे सावध असायचे.मागे मजाच मजा.काहीवेळा खड्ड्यातून हेलकावे खात प्रवास.. हुबळी- धारवाड --बेळगाव-कोल्हापूर-करत कराडला आलो.हायवेटच जिव्हाळा हॉटेलजवळ गाडी थांबवली..एस.टी.डी.बुथवरुन घरी आज रात्री येतोय,असा मेसेज नेहमीच्या ठिकाणी दिला. मस्तपैकी स्पेशल मटणथाळीची व दोन शाकाहारी थाळीची ऑर्डर दिली.तोपर्यंत ट्रीपचा हिशोब केला.सर्वांचे येणे देणे झाले... मस्तपैकी गरमागरम जेवणावर यथेच्छ ताव मारला..समारोपाची पार्टीच म्हणा ना, तदनंतर गावाकडे मार्गक्रमण. सात दिवस बाहेर फिरायला असल्याने घराची ओढ लागली होती..कधी एकदा गाव येतंय अस झालं होतं.. हुरहूर लागली होती... कितीही फिरलो तरी घरं ते घरचं..त्याची सर कश्यालाच नाय...आपला जीवाभावाचा कौंटुबिक परिवार....गावात उशिरा पोहोचलो...
ड्रायव्हरलाही बक्षिशी देवून त्याचे आभार मानले..सात दिवस आनंदात मजेत आणि विविध प्रेक्षणियस्थळं पहाण्यात गेले. मस्तच एन्जॉय केला.. सर्वांनी एकदिलाने आनंद घेतला.एकमेकांच्या स्वभावाची ओळख झाली.एकमेकाला समजून सांभाळून घेतलं.युनिटिने ट्रीप संपन्न झाली.🚩पुन्हा भेटूया नवीन भटकंतीचा आनंदानुभव घ्यायला....
क्रमशः भाग-६४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
🍂🚩🚩🍂🚩🍂🚩🍂
तदनंतर
सन २००३ श्रीरंगपट्टन, म्हैसूर -उटी ते गोवा गावातील कलाविष्कार क्रिकेट क्लब मित्रांसमवेत.
सन २००५ कोकण,गोवा, गोकर्ण महाबळेश्वर,धर्मस्थळ, म्हैसूर व वृंदावन गार्डन, बंगळूर व परत फॅमिली ट्रीप हर्षद, हर्षदा ,वडिल , व जिजीमावशी आणि रविंद्र व राजेंद्र गवते ,प्रकाश भिसे.गणेश मर्ढेकर विनायक जठार , धनंजय जठार (मामा )सोबत
सन२०१९ नळदुर्ग,हैद्राबाद रामोजी, तुळजापूर, अक्कलकोट व पंढरपूर ---मित्रपरिवार श्री प्रशांत वाडकर आणि परिवार ,श्री शिवाजी फरांदे आणि परिवार,श्री रविंद्र लटिंगे आणि परिवार...
सोबत ट्रीप केली आहे.....
🛕🚩🛕🚩🛕🚩🛕🚩🛕🚩🛕
Comments
Post a Comment