माझी भटकंती हैदराबाद शहर पाहणी भाग क्र--५४

 






माझी भटकंती

🍀🔆🍀🔆🍀🔆🍀🔆🍀🔆 
             माझी भटकंती
       क्रमशः भाग--५४
     सन २००१

 दक्षिण भारत सहल-दुसरा दिवस
             🍂हैदराबाद
       🌺 नेकलेस रोड, गार्डन व बिर्ला टेंपल🔆

      उजडायला लागलं तसं एकेक जागं व्हायला लागलं... तानाजी बापू व वाडकरने गाडीतून  बाहेर येऊन अंदाज घेतला... कुठं अंघोळीची  सोय होतीय का? इकडं तिकडं बघितल्यावर सांगायला लागले, 'जवळ पंप आहे व पलीकडे सार्वजनिक स्वच्छता गृह व स्नानगृह  आहे...मग काय  सगळे शुचिर्भूत  झाले.पिंट्या दुध मिळतयका बघायला गेला.... कामगिरी फत्ते करून आला.स्वनिर्मित सहलीतल्या पहिल्या नाष्ट्याला सुरुवात. मस्तपैकी उपीट बनविले.. सर्वांनी नाष्टा व चहापान केले.. आवराआवर सुरू झाली.

    मग नकाशा उघडून  शहरात काय काय बघायचं  यावर चर्चा सुरू झाली..आज दिवसभर हैद्राबाद मधील मेनमेन ठिकाणं  पाहून पुढे जावूया. असं मी सांगितलं.... तेवढ्यात एकजण आमची गाडी पाहून  जवळ येऊन लाॅजिंग मुक्काम विचारु लागला.शहर घुमने आयो हो क्या आपको गाईड मंगताय क्या..  काहीजण नही चाहिए म्हणाले...मी त्याला म्हणालो,"वुई वाॅन्ट गाईड टोटल वनडे.'' मग इतरांना म्हणालो," गाईड केला तर आपण व्यवस्थित ठिकाणं बघू.कुठेही विचारत जायला नको. " सर्वांचा होकार घेऊन त्याला फिक्स केले.व्यवहार ठरला.गाईड ओके म्हणाला.               
   शहर फिरायला सुरुवात केली.गाईड शहराची वैशिष्ट्ये सांगत होता.आम्ही ऐकत होतो.आंध्रप्रदेश (तेलंगणा व सीमांध्र अलिकडे झालेली  दोन राज्ये). राज्याच्या  राजधानीचे हे शहर "  बिर्याणी ,चारमिनार आणि मोती " यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे..गाईड प्रथम आम्हाला नेकलेस रोडला घेऊन गेला.तो नेकलेस रोड व हुसेन सागराची माहिती हिंदी व इंग्रजी भाषेत सांगायचा.आम्ही सगळेजण शांतपणे ऐकायचो.
"हुसेनसागर "तलावाच्या काठाने हैद्राबाद व सिकंदराबाद या जुळ्या शहरांना जोडणारा रस्ता.हुसेनसागर तलाव मानवनिर्मित आहे.तलावात मध्यभागी गौतमबुध्दाचा उंच पुतळा आहे.  हा तलाव मुसा व तिच्या उपनदीपासून बागायती शेती साठी बांधलेला आहे.
वेगळ्या रचनेचा तलाव व रस्ता पाहिला. प्रेक्षकांची व पर्यटकांची भरपूर गर्दी दिसते.
स्वच्छ रस्ता आणि पहाण्यासाठी फुटपाथ, सभोवताली झाडं  आणि खाऊचे स्टॉल.. कॅमेऱ्याने मस्त पैकी विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली..
      हैदराबाद शहरातील अनेक ठिकाणच्या  गार्डन प्रेक्षणिय आहेत... बागेतील थुईथुई उडणारी मनमोहक कारंजी,विद्युत रोषणाई, हिरवेगार मखमली सारखे लॉन, स्वच्छता,
आकर्षकता,सुंदरता,
वृक्षवेलींची विविध आकारातील रचना आणि ही नजाकत बघायला आलेले हौशी व शौकीन पर्यटक... असं  विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न आणि आनंदित होते... असं रमणिय दृश्ये  मनाला भुरळ घालतात....सगळा कंटाळा थकवा मनमोहक दृश्ये पाहून निघून गेला.मन तजेलदार आणि आनंदी होते..आपण आपल्याच मूडमध्ये  ही दृश्य शृंखला हृदयात जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो.  मस्तच नेकलेस रोड पॉईंट.
तदनंतर बिर्ला टेंपल बघितले. पांढऱ्याशुभ्र संगमरवरातील शिल्पकलेचा उत्कृष्ट बांधकामाचा नमुना पहायला मिळाला.प्रशस्त  सभामंडप सुबक नक्षीकाम, आखीवरेखीव पणा,स्वच्छता  पाहून मन थक्क झाले.. मंदिरात गारवा जाणवत होता..   रम्य,भक्तीमय आणि प्रसन्न  ठिकाण... तदनंतर आम्ही शहरातील चार मिनार पहायला निघालो.. तर मग भेटूया उद्या क्रमशः पुढील भागात....

क्रमशः भाग---५४
➿➿➿➿➿➿➿➿➿श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com




लेखन दिनांक...१० मे२०२०






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड