निसर्ग सौंदर्य नेकलेस पॉईंट कविता १३



       नेकलेस पॉईंट

 निसर्गाच्या सौंदर्याची श्रीमंती
 सरीतेचे आभूषण किमती
अनमोल नेकलेस शोभे कंठी
 हिरवी पिवळी रंगीत वेलबुट्टी

नदीचे सौंदर्य पहायला 
हिरव्या शालूचे ऐश्वर्य संगतीला
सिनेमाचे चित्रण स्थळ बघायला
बहारदार  नेकलेस पाॅंईटला


 निसर्गरम्य देखावा पाहूया                     
मनमुरादपणे  नेत्री साठवूया
जीवनदायिनीचा जलअलंकार
चराचरावर करी परोपकार ❗

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड