माझी भटकंती श्रीशैलम ते तिरुपती प्रवास भाग क्र--५८








माझी भटकंती
क्रमशः भाग--५८
दक्षिण भारत
सन २००१
तिसरा दिवस


🏵️🏵️🏵️🏵️🏵️🎋 ☘️🍀☘️🍀☘️☘️

                श्री शैल्लम ते तिरुपती प्रवास


  श्रीशैलम मधून टायगर राखीव (नल्लमाला अभयारण्य)अभयारण्यातील रस्त्याने  आमचा प्रवास नंद्याळकडे सुरू झाला... हिरवीगार झाडी,अवघड वळणं ,चढ-उताराचा रस्ता आणि क्षणाक्षणाला बदलणारी निसर्गाची दृश्ये  पहात आमचा प्रवास चालला  होता..मनात निसर्गाचे अवलोकन सुरू होते.. आणखी
पुढे काय असेल ? याची  उत्सुकता वाढायची. एकदा तर वाटेतच एका  ठिकाणी गाडी थांबवून सुंदर लोकेशनवर छान पैकी  फोटो काढून निसर्गाचा देखावा कॅमेऱ्यात साठविला. रस्त्याच्या पाट्या किंवा नंबरवर प्रादेशिक भाषेत असल्याने.नेमका मार्ग कळायचा नाही... वाटेत चौकशी करणे.आपण विचारले की राईट ऽऽ म्हणून बोलत. याचा अर्थ नेमका समजून आला नाही.  दीर्घ पल्ल्याच्या जंगलवाटेने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांतील लोकांना वेळप्रसंगी  विचारून तर कधी  वाटेतल्या 
एखाद्या दुकानात चौकशी  करत  करत नंद्याळला पोहोचलो.नंद्याळ हा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा लोकसभा मतदारसंघ. हे प्रमोदरावांनी सांगितले... महादेवमंदिराजवळ गाडी थांबवली... आम्ही देवदर्शनाला निघालो. प्रशस्त मंदिर पुढील उंच कमानीवर नक्षीकाम केलेले...प्रवेशकरण्यापुर्वी इतरांचे हातपाय धुण्याचे अनुकरण करून सगळे मंदिरात गेलो....आतमधी  तीन कुंड होती.. पांढरेशुभ्र व चमकदार  पाणी दिसत होते.. मोठमोठे नंदी होते...देवाचे दर्शन घेतले.पुढे कडाप्पा तिरुपती बालाजीचा रस्ता विचारून  पुढे निघालो...
राजकारण व क्रिकेटवर गप्पामारत एखाद्याची फिरकी घेत.टिंगल करत..खरखोट करायला जेवणाची पैज लावत..एखाद्याने केलेल्या विनोदा दात काढत प्रवास चालला होता... मस्तपैकी सुका लाडू-चिवड्याचा नाष्टा करत गाणी ऐकत चाललो होतो.लांबचा पल्ला होता
विस्तीर्ण भातशेती, नारळीच्या बागा, हिरवीगार बागायती शेती होती....कडापा जिल्ह्याच्या ठिकाणी आलो.... तिथं चहापाणी घेतला..सतत गाडीत बसून कंटाळा यायचा... थोडावेळ तिथेच थांबून रात्रीच्या जेवणाची चर्चा करु लागलो... बालाजी दोनशे किलोमीटर असेल.आपण सात  वाजता जेवणाच्या
तयारीला लागू...जेवण उरकून मग  मुक्कामी  बालाजीला जावू... वाटेत  जाताना  चिकन घेऊया.सगळ्यांच्या सहमतीने नियोजन केले.
मग कडाप्यातून पुढे निघालो.
      एका चिकन शॉपजवळ थांबून चिकन व इतर साहित्य खरेदी केले... वाटेलाच सातच्या दरम्यान पाण्याची सोय पाहून एका धाब्याच्याजवळ थांबून जेवणाची तयारी सुरू झाली... नेहमीप्रमाणे कामं सुरू.चिकनरस्सा,भात,भाकरी आणि शाकाहारी साठी बटाट्याचं कालवण.जेवायाला बसण्याच्या वेळी स्टोव्हवरुन  कालवणाचं पातेलं उतरताना हेंडकाळल्याने रस्स्याचे काही थेंब वाडकरांच्या डोळ्यात उडाले...आगीने डोळा लाल झाला. रुमाल पाण्याने भिजवून डोळ्यावर ठेवायला लावला.. तदनंतर  जेवायला सुरूवात केली..कालवणात  भाकरी कुस्करून खाल्ली..पितळीची उणीव पत्रावळीने भरुन काढली..आठजणांनी सगळा रस्सा फस्त केला.. तृप्तीचा ढेकर  पोटभरून जेवल्याचे  दर्शवित होते.....
... जेवण चांगलं मिळालं की मस्त ट्रीप.... आवराआवर करून आम्ही मध्यरात्रीच्या सुमारास तिरुपती बालाजीला पोहोचलो.... धर्मशाळेकडे गेलो.तिथं  दोन खोल्या मिळाल्या.छानपैकी विश्रांतीची सोय झाली... उद्या दर्शनासाठी लवकर उठून तयार होण्याचे सर्वांशी बोलून
शुभ रात्री केले....


क्रमशःभाग क्र.५८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड