माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग क्र.६९
माझी भटकंती
क्रमशः भाग- ६९
भेट दिनांक १० नोव्हेंबर २०१९
🎭🎞️🎥🎞️🎞️🎞️🎞️🎞️
🎥रामोजी फिल्मसिटी🎥
सकाळी लवकरच हैद्राबाद मधून रामोजी फिल्मसिटी पहायला निघालो. लांबूनच दिसणारी " RAMOJI"
अक्षरे पहात पहात आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.गाडी पार्क केली.गरजेचे साहित्य सोबत घेऊन वेटिंग रुमजवळ थांबलो.दिवाळी नंतरचा कालावधी मुळे भरपूर गर्दी दिसत होती.तिकिट काढण्यासाठी दहा-बारा रांगा होत्या. आॅनलाईन तिकिट काढण्यासाठी एका कमी गर्दीच्या रांगेत उभे राहिलो..लहान मुलांनाचे तिकीट उंचीवर होते .हे तिथं प्रत्यक्ष एका छोट्या मुलीची उंची मोजताना बघितल्यावर लक्षात आले.आमच्यात लहान दोन मुली होत्या.दोघींपैकी एकीची उंची तीन फुटांपेक्षा जास्त भरली त्यामुळे आठ प्रौढ व एक चिल्ड्रन अशी तिकडे काढली.प्रौढ प्रति १३६०रुपये तिकिट आहे.सर्वसुखसोयींनी युक्त प्रवेशद्वार आहे.स्वच्छता व टापटीप चांगली होती.सगळेजण तिकिट दाखवून आत गेलो.चेकिंग झाले.दिलेलं स्टीकर शर्टच्या खिश्यावर योग्य ठिकाणी चिकटवले.मस्तपैकी फिल्म सिटीच्या लोगोजवळ फोटोसेशन केले व फिल्म सिटीकडे घेऊन जाणाऱ्या बसची वाट पाहत रांगेत थांबलो.पाचेक मिनीटात बस आली. आम्ही फिल्मसिटी बघायला बसने निघालो.
सिनेजगतातील अतिभव्य शुटिंग स्टुडिओ
"रामोजी फिल्मसिटी" हैदराबाद
जादूई आणि अद्भुत मायावीनगरी सिनेसृष्टीतील एक नामांकित डेस्टिनेशन जगभरातील लाखो हौशी पर्यटक यास्थळास भेट देण्यासाठी आवर्जून येतात.... नवलाईची विविध ठिकाणे बघितली की सिनेसृष्टीचे विद्यापीठच आहे असं माहितीपत्रकावर दृष्टि फिरवताच जाणवले.अनेकविध चित्रपट एकाच चित्रणस्थळी तयार होतात.ही नवलाई नव्हे काय.
रामोजी फिल्मसिटी वर नेमके काय लिहावे असा विचार मनात आला.एका लोकेशनवर एक लेख लिहायचा प्रयत्न केला तर कमीतकमी पंचवीस पेक्षा जास्त लेख निश्र्चितच होतील.. इतकं अवलोकनासाठी अनेक इनडोअर व आउटडोअर शुट लोकेशन अप्रतिम शैलीने बनविलेली आहेत. उत्तम मानवनिर्मित सौंदर्यवान स्थळ ...बसने आम्ही स्टुडिओतील मैदानावर उतरलो.मायावीनगरीची चुनूक सगळीकडे दिसू लागली.वंडरफुल सगळच अद्भुत दिसत होतं.आम्ही इतरांचे अनुकरण करत , इतरांच्या मागोमाग इंग्रजी भाषेतील निवेदनाच्या आवाजाच्या दिशेने एका स्टुडिओकडे निघालो.. प्रवेशद्वाराजवळ नृत्यांगना बहारदार नृत्य वेस्टर्न संगितावर सादर करुन स्वागत करीत होत्या..'WILD WEST STANT SHOW' या ओपन थिएटरमध्ये प्रवेशलो. भव्यदिव्य सेट होता.बसण्यासाठी पायऱ्यांचा उतार होता.बरीच गर्दी होती.शो सुरू होईपर्यंत सगळे फोटोग्राफीची हौस करत होते.तिथं एक अॅक्शनपट बघितला..जबरदस्त लाईव्ह शो आम्हाला बघायला मिळाला.फारच डेअरिंगबाज शो .काही हौशी पर्यटक त्या शोमधील कलाकारांसोबत सेलिब्रिटी समजून शो झाल्यावर सेल्फिघेत होते.फोटो काढत होते.तेथून आम्ही डान्स थिएटरकडे निघालो.तिथं एव्हेंटमध्ये गाण्याचे शोज होतात तसे प्रत्यक्ष डान्स बघायला मिळाले.अप्रतिम नेत्रदीपक लाईटिंग आणि गाण्याच्या ठेक्यावर बहारदार नृत्य पाहून फारच आनंदीआनंद झाला...लय भारी डान्सिंग शो सादर झाला.......
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment