निसर्ग सौंदर्य पाझर तलाव जांभळी ३



         पाझर तलाव
ऋतू हिरवा,दुधाळ जलधारा
शिवारात आला गार वारा ।
आकाशी काळेभोर मेघ
वर्षावती संततधार रेघ।
तलावातील मायंदाळ पाणी
फेसाळत जाते गुंजवाणी ।
हे देखणं रूप बघुनी
गाते  मन आनंद गाणी ।
 वाऱ्याच्या स्पर्शाने मोहरायचं
पावसात सखे चिंब भिजायचं 
निसर्गाशी भ्रमंतीचंं नातं जपायचं
जीवनात पाण्यावाणी प्रवाहीत रहायचं


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी