निसर्ग सौंदर्य रस्ता सोनेश्वर ओझर्डे ५



💧🍀🍁💧🍀🍁💧🍀
        रानातला रस्ता
पाऊस पडला,
 रस्ता थाटला...!
वाटेच्या गुलमोहराने 
गुलाल उधळला....!!

  रुबाबदार  सडक...
 दुतर्फा लालभडक...!
फुलांची नवझळाळी ...
 निसर्ग सृष्टी खुलली......!!

पाकळ्यांचा सडा 
शोभे सडकेच्या कडा..!
हिरव्यागार झाडा
वाचू शिवाराचा धडा..!!

पावसाचे रिंगण...,
जलबिंंदूचेेेे शिंपण....!
धूसरले वण
चकाकले तन....!!




श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
सोनेश्वर रस्ता ओझर्डे
छायाचित्र श्री प्रमोद निंबाळकर यांचे सौजन्याने

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड