वृक्ष संवर्धन कोंढावळे परिसर कविता बिठ्ठीचे झाड १२
☘️बिठ्ठीचे झाड ☘️
🔅पिवळी कण्हेरी🔅
परिसरात फिरताना नजरेत भरलं
पहाया उत्सुकतेने हातात धरलं
पिवळंधम्मक फुल नाचू लागलं
कळ्या फुलांनी सजू लागलं
दोन वर्षांपूर्वीचं रोपटं झुडूप झालय
खुललेल्या कळीचं फुल झालय
टोकदार पर्णात गेंददार सूमन
नव मित्राचे शानदार आगमन
मित्रा तू बहरत रहा
कळीचा फुलोरा करत रहा
फुलांची फळे होऊद्या
खेळाला बिठ्ठी मिळूद्या...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment