माझी भटकंती दक्षिण भारत पहिला दिवस भाग क्र.५३

शालेय उपक्रम माझी भटकंती पुस्तक परिचय माझी ज्ञानमंदिरे Lifestyle प्रश्नपेढी सामान्य ज्ञान


माझी भटकंती
क्रमशः भाग-५३
➖♾️➖♾️➖♾️➖♾️      
           दक्षिण भारत सन २००१
           पंढरपूर --ते हैद्राबाद प्रवास 

       पंढरपूर आल्यावर चंद्रभागेत हातपाय धुवून देवदर्शन करायला देवळात आलो.दर्शनाची भलीमोठी रांग पाहून ठरवले.आपण  मुखदर्शन व कलशदर्शन करुया.मग त्या रांगेने दर्शनासाठी गेलो.... भक्तिभावाने पंढरीच्या पांडुरंगाचे व रखुमाईचे दर्शन घेतले..मन तजेलदार झाले.थोडा वेळ मंडपात सगळेजण शांतपणे नामस्मरण करत बसलो..प्रसन्न वातावरणात पांडुरंगाची कैवल्यमुर्ती ह्रदयात सामावुन घेत होतो.. तदनंतर बाहेर येऊन एक प्रदक्षिणा काढली..बोला पुंडली......असा मुखाने नामघोष करत होतो. संत नामदेव पायरी जवळ दर्शन घेतले... तदनंतर
पहिला सोनी कॅमेऱ्याने फोटो काढला..क्लिक केले की फ्लॅश पडायचा..सगळ्यांच फ्लॅशवर लक्ष...पडलाका फ्लॅश,काढलाका फोटो का नुसताच फ्लॅश टाकला....यावर गंमतीशीर बोलणं.    क
    श्री शिवाजी फरांदे  काका भाविक संप्रदायातील  वारकरी होते.,सगळे  दर्शन झाले  की "बोला पुंडलीका वर दे ,हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...असं हात जोडून नामघोष करायला लावला....प्रसादपुडा घेऊन सर्वांना बुक्का लावला ,साखरफुटाणे दिले.  चहापाणी केला. प्रसादपुडा व बुक्का घेतला..कळसाचे एकवार दर्शन घेतले.मग आमची गाडी सोलापूर कडे निघाली....... थोड्या वेळाने पाठीमागे बसलेल्या पैकी एकजण म्हणाला, नाष्टा करायचाय का ? चालेल बरेच जण म्हणाले.कागदीडीश मध्ये एक लाडू,दोन चकल्या व चारमुठी चिवडा घालून डीश तयार.. एकमेकांकडे पार्सल करत  नाष्टा सुरू झाला...पुढच्यांनी परत कायतरी मागितलं की इथं येवून घे.. आमाला खावदे. असं मागील सिटवरुन आवाज येणार. लटका राग यायचा आणि पाणी पिलं की विरुन जायचा...अश्या गमतीदार जमती करत  प्रवासातील अंतर कापत होतो.

 रात्रीच्या वेळी बीदरच्या दरम्यान एका हॉटेलजवळ गाडी थांबवून सगळे खाली उतरलो.. येताना आणलेला जेवणाचा डबा घेतला...एकाने हाॅटेलवाल्याला जावून इथं आम्ही आणलेलं जेवण केले तर चालेल का विचारले.त्याने होकार दिला.तोपर्यत वाडकर
 पिण्याच्या पाण्याचा कॅन व बाटल्या भरून घेवून आले .फडक्यात ,व प्लॅस्टिक पिशवीत आणलेलं  जेवण उघडले ,एकमेकांना देत हादडायला सुरुवात झाली.. शेंगदाण्याची चटणी, म्हाद्या,बेसनपोळी व लोणचं  तोंडी लावायला बुक्कीने फोडलेला कांदा खात  मस्तपैकी जेवायला सुरूवात केली.... बेलोशे ड्रायव्हला कमी जेवा रात्रभर प्रवास करायचाय.. असं प्रमोदरावांनी सांगितले.   सगळ्यांचे जेवण झाले.

   हैद्राबादकडे रात्रीचा प्रवास सुरू झाला.काहीजण डुलक्या काढत होते.. फक्त पुढची शीट जागसुद.गाडी थांबली की लक्षात यायचं.ड्रायव्हर,विठूनाना व शिवाजीराव चहा घेत असतील.... दोन तीन वेळा गाडी थांबली... पहाटे पहाटे आम्ही हैद्राबाद मध्ये पोहचलो.त्याने .गाडी बाजूला लावली.व म्हणाला ,'मी जरा विश्रांती घेतो'.....झोप डोळ्यावर आलिय.' आम्ही तसेच गाडीत थांबलो...
क्रमशः भाग--५ ३

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड