माझी भटकंती रामोजी फिल्मसिटी भाग--७१
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
Lifestyle
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
माझी भटकंती
क्रमशः भाग-७१
रामोजी फिल्मसिटी
दिनांक १० नोव्हेंबर २०१९
माझी भटकंती
क्रमशः भाग-७१
रामोजी फिल्मसिटी
दिनांक १० नोव्हेंबर २०१९
🎞️⛲🎞️⛲🎞️⛲🎞️⛲
🛣️ आऊटडोअर शुटिंग🛣️
सव्वा एक वाजता बसने आऊटडोअर शुटिंग पाईंटकडे निघालो... बसमधून दोन्हीकडे बघत बघत आणि गाडीतला निवेदन जे सांगतो ते ऐकत इकडं तिकडं पहायचे.अनेक गाजलेल्या सिनेमाच्या शुटिंगची स्थळ, खेडेगाव,शहर,हायवे, डोंगररस्ते,दवाखाने,जेल,शाळा,चौक, गल्ली आणखी कितीतरी स्थळे पहात पहात रामायण ,महाभारतातील दरबार, परदेशातील शहर व रस्ते,बघत बघत एक लोकेशन पाहून झाले की पुढील लोकेशनवर गाडीने जायचे असा नित्यक्रम होता.. रेल्वे स्टेशन (मथूरा जंक्शन), विमानतळ व विमान लोकेशन बघितले.मस्तपैकी विमानात बसल्याचे सुख अनुभवले.फोटोग्राफी केली... संपूर्ण भारतातील नामांकित वास्तू व मंदिरे यांची हुबेहूब प्रतिकृती तिथं बघायला मिळाली..अशी विविध चित्रणस्थळे नवलकथेतील जादूई दिसतात.
सायंकाळच्या सुमारास बाहुबली सिनेमाचे शूटिंग झालेले ठिकाण बघितले.. अप्रतिम प्रेक्षणिक शुटिंग स्थळ दिसत होते.भव्यदिव्य प्रवेशद्वार,राजदरबार,रथ,घंटा,ध्वज,नगारा इत्यादी स्थळ पाहून हरकूनच जातो आपण...सुपरब अतिभव्यदिव्य लोकेशन .उंचच उंच पुतळा . इतर आऊटडोअर शुट पैकी इथ सगळ्यात जास्त गर्दी होती.
तदनंतर आम्ही धबधबे पहायला आलो.तिथं उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याने शरीराला गारवा मिळाल्यावर बरं वाटत होतं.धबधबच्या समोर बसून जोडीने फोटोसेशन केले.मस्त, मज्जाच मज्जा.. छोटे-मोठे धबधबे पहात पहात फुलपाखरं गार्डन मध्ये आलो.अप्रतिम रंगिबेरंगी फुलपाखरं झाडंवेली वर बसलेली तर क्षणात चोहिकडे उंडरणारी पाहाताना मनस्वी आनंद होत होता.कितीतरी फुलपाखरं बागडत होती.. काल पाहिलेल्या बटरफ्लाय पार्कची आठवण झाली. फुलपाखरांची माहितीचे फलकही आकर्षक आहेत. फुलपाखरं आपले लक्ष वेधून घेतातच. आम्हीही लहानमुलांप्रमाणे बटरफ्लाय सेल्फि पाॅईंट जवळ फोटोग्राफी केली.तदनंतर विविध रंगिबेरंगी पक्ष्यांचे संग्रहालय बघितले.जगभरातल्या विविध पक्ष्यांची तिथं रेलचेल आहे...प्रत्येकाची स्वतंत्र सोय..कधीही न पाहिलेले पक्षी होते.काहींची नावे माहित होती परंतु प्रत्यक्ष पाहिले नव्हते.
तिन्हीसांज होत होती.त्यावेळी आम्ही वृक्षांचे बोन्साय गार्डन बघत होतो.विविध वृक्षांची कुंडीत आकर्षण मांडणी केली होती.तदनंतर एका सुंदर बागेत आलो.एकाच रंगांच्या फुलांचे ताटवे वापरून सुशोभित गार्डन बनविली होती.फुलझाडांची नाविन्यपूर्ण आणि कल्पनेने सुबक मांडणी केली होती. लाल,पिवळ्या,पांढऱ्या, गुलाबी रंगछटेची फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डुलत होती.
आकर्षक फुलझाडांनी आणि रंगिबेरंगी कारंज्यांनी नटलेली बाग ,कारंज्याचे विविध प्रकार थुईथुई ते रेनगनफवारे.लाईटिंग सुरू केल्यामुळे आता फिल्म सिटीचे सौंदर्य बहारदार दिसू लागले.... एखाद्या राजाचा विलोभनीय राजवाडा आणि राजधानीच जणू.आकर्षक विद्युत रोषणाईने तिथली शुटिंग स्थळ उजळून निघाली होती.. विहंगम आसमंत दिसत होता.स्वप्ननगरीच दिसत होती....रमणिय वातावरणात शांतपणे बागेतील लॉनवरअनवाणी फिरुन गवताचा पायांना होणाऱ्या हळुवार स्पर्शाचा अनुभव घेतला..शांतपणे गप्पामारत बसलो.मस्तच सिनेमानगरी ....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Nice location and trip
ReplyDelete